पत्नी व तिच्या मानलेल्या आई-वडीलाच्या त्रासास कंटाळून तरूणाने घेतला गळफास

  नांदेड. (विशेष प्रतिनिधी) पत्नी आणि तिच्या मानलेल्या आई- वडिलांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय तरूणाने भाड्याच्या खोल...

 

नांदेड. (विशेष प्रतिनिधी) पत्नी आणि तिच्या मानलेल्या आई- वडिलांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय तरूणाने भाड्याच्या खोलीतील पंख्याला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील एनडी-२, क्रांती चौक परिसरात निदर्शनास आली आहे.

याप्रकरणाची विश्वसनीय सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दापशेड (ता. लोहा) येथील मूळरहिवासी असलेले दत्ताराम रामराव मोरे व त्यांची पत्नी मनिषा मोरे हे दांपत्य गत दोन वर्षापासून नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या क्रांती चौक परिसरातील व्यापारी सुनील दर्डा यांच्या इमारतीमध्ये किरायाने राहत होते. दरम्यान, दत्ताराम मोरे हे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता राजनगर येथे राहत असलेल्या आईकडे गेले. त्याचवेळी, त्यांनी आई, मला माझी पत्नी मनिषा व 'ति'ची मानलेली आई संध्या विजय मुळे व तिचा पती विजय मुळे हे तिघेजण मला फारकत मागत असतात. याशिवाय, त्यांनी माझ्यासमवेत मनिषा हिला नांदायचे नाही, त्या बदल्यात तु दहा लाख रूपये दे म्हणून मला मागत आहेत. त्यांचा मला खूपच त्रास होत आहे, त्यांच्या त्रासाने माझे जगणे कठीण झाले, असे अतिशय निराश होवून सांगितला आहे. दरम्यान, आपण दत्ताला धीर देवून तु तुझे काही बरे वाईट करून घेवू नकोस. पैशाचे काही तरी बघता येईल, असे मुलास सांगितले तेंव्हा दत्ता अतिशय निराश अवस्थेमध्ये निघून गेला. त्यानंतर रात्री सात वाजेचे सुमारास सून मनिषा व 'ति'ची मानलेली आई संध्या विजय मुळे या दोघीजणी आपल्याकडे राजनगर येथे घरी आल्या. त्यावेळी, सून मनिषा म्हणाली की, मला तुझ्या मुलासोबत रहायचे नाही, तुझ्या मुलामुळे माझे आयुष्य बरबाद झाले. मला त्याच्याकडून फारकत पाहिजे व त्याबदल्यात मला १० लाख रूपये द्या, म्हणून संध्या व सून मनिषा यांनी मला दमही दिला. याशिवाय, 'त्या' दोघी 'उद्या बघ, तुझ्या मुलाचे काय होते, ते असे म्हणून शिविगाळ करून निघून गेल्या, असा उल्लेख मयत दत्ताराम मोरे यांच्या मातोश्री गोदावरी रामराव मोरे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुक्तरे आणि पोलीस ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी दिली आहे. 

सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे, आपला मुलगा दत्ताराम मोरे हा भाड्याने राहत असलेल्या घराचे मालक सुनील दर्डा यांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता फोन करून तुझ्या मुलाने फाशी घेवून त्याच्या खोलीत आत्महत्या केली असल्याचे सांगितले. त्याचवेळी, उपरोक्त खोलीची आतूनच कडी लावलेली आहे,असे सांगितले, तेंव्हा आपण आणि लहान मुलगा वैभव मोरे तातडीने घरमालक सुनील दर्डा यांच्या वाड्यात पोहोचलो. त्याचक्षणी, मुलगा दत्ताराम मोरे राहत असलेल्या खोलीच्या खिडकीमधून पाहिले, तेंव्हा छताच्या पंख्याला दोरीने गळफास लावून दत्ता लटकत असलेल्या अवस्थेमध्ये दिसला. मुलगा दत्ता याला सून मनिषा मोरे, शिवाय 'ति'ची मानलेली आई संध्या मुळे आणि संध्याचा पती विजय मुळे हे तिघेजण फारकत दे व १० लाख रूपये दे, म्हणून सतत तगादा लावून त्रास दिला. शिवाय, 'त्या' तीन जणांनी मानसिक त्रास देवून मुलगा दत्ता यास आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा स्पष्ट आरोप मयत दत्ताराम मोरे यांच्या मातोश्री गोदावरी रामराव मोरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचे ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस अश्विनी मस्के यांनी सांगितले आहे. 

याप्रकरणी गोदावरी रामराव मोरे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उपरोल्लेखित तीन आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, नांदेड ग्रामीण पोलिसांनी प्रस्तुत प्रकरणातील सर्व आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळल्या असल्याचेही विश्वसनीय वृत आहे. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व हेडकॉन्स्टेबल उध्दव भारती आणि त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group