मुंबईदि.१७:आयुष्यभर कामगार चळवळीत कार्य करीत असताना सहकार, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या निवृत्ती देसाई यांना भविष्यकाळ निश्चितच उज्वळ ठरेल,असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे व्यक्त केला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार, महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्ताने कौटुंबिक स्वरूपात मनोहर फाळके सभागृहात गुणगौरव सोहळा पार पडला.त्या प्रसंगी अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छाने त्यांचा सन्मान करुन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.सरचिटणीस गोविं दराव मोहिते यांनीही त्यांचे शुभचिंतन केले.
स्व.गं.द.आंबेकर यांच्या विधायक विचाराला अनुसरून संघटनेचे नेतृत्व घडत गेले.तोच वारसा जतन करीत खजिनदार निवृत्ती देसाई
यांनी सार्वजनिक जीवनात नेहमी सामान्य माणसाला मदतीचा हात दिला आहे.म्हणूनच सामान्य माणसाचे ते चाहते ठरले, असेही सचिनभाऊ अहिर अध्यक्षस्थानावरून आपल्या भाषणात म्हणाले.
निवृत्ती देसाई ना.म.जोशी मार्गावरील बंड्या मारुती सेवा मंडळाचेही
अध्यक्ष आहेत.मंडळाच्या वतीने अमृतमहोत्सवी वाढ दिवसा निमित्त सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते त्यांचा ह्रुद्य सत्कार करण्यात आला.त्या वेळी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.या क्रीडा क्षेत्रा बरोबरच निवृत्ती देसाई यांनी आपल्या गावी भव्य शाळा उभारून,आपले बहुआयामी कार्य दाखवून दिले आहे,असे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गुणगौरव करताना म्हटले आहे.राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघातील संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा महाव्यवस्थापक विलास डांगे यांनी गुणगौरव केला आहे.
सर्वश्री उपाध्यक्ष आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण,एम.पी.पाटील, सुरेश मोरे,नामदेव झेंडे, मुकेश तिगोटे आदिंची भाषणे झाली.
खजिनदार निवृत्ती देसाई सत्काराला उत्तर देताना म्हणाले, निष्ठा आणि प्रामाणिकपणा कायम ठेऊन काम करण्याची प्रेरणा अध्यक्ष
सचिनभाऊ अहिर यांच्या कडून मिळालेल्याने भविष्यात यश मिळत गेले आहे.सर्वश्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष राजन लाड,आंबेकर श्रम संशोधनचे संचालक जी.बी.गावडे, मा.नगरसेवक सुनिल अहिर,साई निकम,आदी त्यावेळी उपस्थित होते.
*******

COMMENTS