लातूर दि. 17 सप्टेंबर 2022 देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सेवा पंधरवाडा...
लातूर दि. 17 सप्टेंबर 2022
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री सुरेश जी खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 170 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास लातूरचे खासदार मा. सुधाकर जी शृंगारे, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य शैलेश लाहोटी, भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ जी मगे, भाजपा लातूर संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, सेवा पंधरवाडा संयोजक तथा उपाध्यक्ष किशन बडगीरे, सेवा पंधरवाडा सहसंयोजक ऍड. विजय औचारे, युवा मोर्चा प्रदेश सचिव ऍड. गणेश गोमचाळे, मंडल अध्यक्ष रवी सुडे, ज्योतिराम चिवडे, संजय गीर, ललीत तोष्णीवाल, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष किर्ती स्वामी, शरणाप्पा आंबूलगे समवेत भाजपा शहर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

COMMENTS