नांदेड :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर विविध उपक्रमांनी साजरा होत असताना नांदेड येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या वतीने आगळ्यावेगळ्या उपक्रमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून नांदेड वासियांची मने जिंकली.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 75 मीटर तिरंगी कापडावर भारत देशाची 75 वर्षातील उल्लेखनीय कामगिरी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून कापडावर साकार केली. शाळेतील सहशिक्षक उदयराज माळवेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 75 वर्षातील 75 उल्लेखनीय कामगिरी वरील या भित्तिपत्रकाचे विमोचन माजी मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी जिल्हाधिकारी डॅा. श्री विपीन इटनकर, माजी डी.पी. सावंत , मा. श्री अमरनाथ राजुरकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी पाटील कल्याणकर, महापौर जयश्रीताई पावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या भितीपत्रकात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असावा यासाठी केशरी आणि हिरव्या रंगाचे विद्यार्थ्यांच्या हाताची ठसे घेण्यात आले. हे ठसे कापडावर उमटविण्यात आले. मध्यभागी पांढऱ्या रंगांमध्ये 75 वर्षा ंमधील उल्लेखनीय कामगिरी वरील चित्रे चिटकवण्यात आली. या चित्रांच्या खाली संपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या चित्राबद्दलची माहिती प्रेक्षकांना सांगितली. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर हे चित्रप्रदर्शन महात्मा फुले पुतळा आयटीआय, नांदेड येथे भरवण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल शाळेच्या संस्थापिका महापौर जयश्रीताई पावडे, ऍड. निलेश पावडे, प्रशासकीय अधिकारी आशा पैठणे , मुख्याध्यापक सो. वैशाली देशमुख ,विभागप्रमुख स्वाती तळणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांचे कौतुक केले आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS