भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असुन "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ...
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असुन "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत "स्वराज्य सप्ताह" साजरा करण्याबाबत शासनाने कळविले आहे.
त्या अनुषंगाने आज दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत प्रांगणात मा.महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समूह" राष्ट्रगीत गायन" करून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त" स्वराज्य सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने नांदेड शहरातील सर्व नागरिकांना दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे असे आवाहन.
करण्यात येत आहे.

COMMENTS