सकारात्मक दृष्टीने केलेल्‍या कामगिरीबद्दल मला माझ्या टीमचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


 नांदेड,15- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचून जिल्हा परिषदेच्‍या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सकारात्मक दृष्टीने केलेल्‍या कामगिरीबद्दल मला माझ्या टीमचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

    भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्‍या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्‍या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते घ्‍वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी त्‍या बोलत होत्या. यावेळी प्रकल्‍प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा  ित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डॉ. नामदेव केंद्रे, व्ही. आर. पाटील, रेखा काळम कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्राथमिकच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्‍यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्‍हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. भुपेद्र बोधनकर, जिल्‍हा कृषी अधिकारी टी.जी.चिमनशेट्टे आदींची उपस्थित होती.

      पुढे त्या म्हणाल्या, आजादी का अमृत महोत्सवानिमित्त नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातून आपण पाच लाख तिरंगा ध्वज लावले आहेत. विशेषतः जिल्हा परिषदेने आवाहन केल्यानुसार अनेक महिलांनी तिरंगा ध्वज लावण्‍यासाठी पुढकार घेतला, ही अभिमानाची बाब आहे. नांदेड जिल्हा परिषद राज्यांमध्ये सर्व विभागात अग्रेसर राहावी यासाठी तत्परतेने व पूर्ण क्षमतेने सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. तसेच महिला व पुरुष हा भेद न राहता, एक संघतेने व पूर्ण सक्षमतेने पुढे येऊन सर्वांनी ग्रामविकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्‍त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

     याप्रसंगी किड्स किंग्डम पब्लिक स्कूल खुरगाव येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, योद्धा गीत व इंडियन आर्मी थीमचे सादरीकरण केले. सासाठी संगीत शिक्षक विनोद राणे, वीणा ठाकूर, सागर सर, दिपाली मॅडम, एन.एम. पारदे यांनी नियोजन केले. नागार्जुना पब्लिक स्कूलच्‍या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड व सलामी दिली. सासाठी सहशिक्षक सुहास सर संचालन केले. यावेळी अंध्रा समिती हायस्‍कुलच्‍या विद्यार्थिनींनी सहशिक्षक राजकुमार राठोड यांच्‍या संचलानात काढलेल्‍या तिरंगा रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गर्ल्स हायस्कूल येथील विद्यार्थिनी राष्ट्रगीतासाठी जिल्हा परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या. शिक्षक आर.के. पांचाळ, संदीप मस्के, सौ. व्‍ही.डी. मानकरी, वंदना काशीदे यांचे यासाठी सहकार्य लाभले.

      याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांना ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्‍हणून पदोन्नती मिळाल्‍याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते त्‍यांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्‍या महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आरसीटीच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नलसे जल योजनेत शंभर टक्‍के नळ जोडणी दिलेल्या पाच ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक तर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारी मुक्त अधिकमध्ये उत्कृष्ट कामगीरी केलेल्‍या साप्‍ती तालुका हदगाव, हाडोळी तालुका भोकर, जवळगाव तालुका हिमायतनगर, भंडारवाडी तालुका किनवट व कामळज तालुका मुदखेड सन्‍मान करण्‍यात आला. तसेच स्मार्टग्राम मध्‍ये उल्‍लेखनीय काम करणा-या हाडोळीसह इतर गावांना गौरविण्‍यात आले.

     यावेळी जिल्‍हा परिषद परिसरात फाळणी अत्‍याचार स्मृतिदिनानिमित्त उभारण्‍यात आलेल्‍या चित्र प्रदर्शानास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली. आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये सेल्फी पॉईंट तयार करण्‍यात आला होता. संपादक चंद्रकिरण कुलकर्णी यांच्‍या साप्‍ताहिक नंदिग्राम लोकक्रांती वार्ताच्‍या वतीने  आजादी का अमृत महोत्सव विशेष अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी, अनिता दाने व मिलिंद व्यवहारे यांनी केले. सदर कार्यक्रमाला खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या