नांदेड : शेतकर्यांची तूर बाजारात येण्यास सुरूवात झाली तोच केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकर्यांच्या मुळावर घाव घालत मुक्त तूर आयात कराराला एक वर्षाची मुदतवाढ दिली (31 मार्च 2023) त्यामुळे यंदा देशात तूर कमी उत्पादन होऊनही येणार्या काळात तुरीचे भाव वाढतील अशी शक्यता कमी आहे यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा फेरविचार करून आयात तुरीवर शुल्क आकारावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे .
यावर्षी तुरीचा पेरा काही प्रमाणात कमी झाल्याने देशांतर्गत तूरडाळीचा साठा मर्यादित आहे त्यामुळे येणार्या काळात शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या आशेवर पाणी फेरत 31 मार्च 2022 संपणाऱ्या तूर आयात मुक्त करारास एक वर्षाची मुदतवाढ दिली . त्यामुळे कसल्याही प्रकारच्या आयातशुल्क शिवाय म्यानमार बर्मा मालावी मोझांबिक केनिया या देशांतून मोठ्या प्रमाणावर भारतात तूर आयात होणार आहे . देशात तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीला चांगला भाव मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु सर्व केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तुरीला समाधानकारक भाव मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी तुरीचा पेरा कमी होईल परिणामी केंद्र सरकार तूर आयात करण्याचा निर्णयही घेऊ शकते म्हणजे तुरीचा पेरा कमी झाला तरीही शेतकर्यांचे नुकसान आणि तुरीचा पेरा जास्त झाला तरीही शेतकर्यांचे नुकसान करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल म्हणून केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून आयात होणार्या तुरीवर आयात शुल्क आकारावे जेणेकरून देशांतर्गत तुरीला चांगला भाव मिळेल अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली

COMMENTS