नांदेड.(विशेष प्रतिनिधी) माळाकोळी (ता. लोहा) येथील मुळरहिवासी तथा बिलोली तालुक्यातील रामतीर्थ ("शंकर" नगर) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चंद्रकांत माधवराव चाटे (वय ४५) यांनी राहते घरी गळफास घेऊन आपली 'जीवन' यात्रा संपविली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी माळाकोळी येथे उघडकीस आली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दिवंगत चंद्रकांत माधवराव चाटे यांनी माळाकोळी येथे त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या का केली असावी, याचे नेमके कारणही अद्याप समजले नाही. पोलीस नाईक दिवंगत चंद्रकांत चाटे यांच्या पार्थिव देहावर शनिवारी (९ ऑक्टोबर रोजी) सकाळी ११ वाजता त्यांच्या मुळगावी माळाकोळी(ता.लोहा)येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, एक मुलगी व जावई असा परिवार आहे. दिवंगत चंद्रकांत चाटे हे यापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावले आहेत.
COMMENTS