मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ-पाथरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.मात्र गेंड्याचे कातडे पांघरलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याने या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होऊन हानी झाल्याचे अनेक उदाहरणे देऊनही आणि निवेदनाचा पाऊस पडूनही या विभागाला जाग येत नसल्याने योगेश्वरी शुगर या खाजगी तत्त्वावरील साखर कारखान्याने परिसरातील मृत रस्त्यांना जिवंत रुप आणत परिसरातील ४० ते ४५ किलोमीटर यात योगेश्वरी साखर कारखाना ते गवळीपिंपरी,योगेश्वरी साखर कारखाना ते फुलरवाडी,लिंबा,वाघाळा,आदींसह इतर रस्त्यावरील झाडे झुडपे तोडणे,इतर रस्ते दुरुस्त करत पडलेल्या पावसामुळे खड्डयात खडी,मुरूम टाकून खडीकरण करुन आपले योगदान दिले आहे.सदर रस्त्यामुळे परिसरात योगेश्वरी शुगरचे संचालक माजी आ.आर.टी.देशमुख(जिजा)मॅनेजिंग डायरेक्टर अँड.रोहीत देशमुख यांनी पुढाकार घेऊन ३० ते ४० लक्ष रुपये स्वखर्चाने खर्च करत असल्याबद्दल आभार व्यक्त केल्या जात आहेत.परभणी जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या सोनपेठ तालुक्यात जाण्यासाठी पाथरी सोनपेठ या दोन तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ताच यावर्षीच्या पावसामुळे गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रस्ता नसल्याने याठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने व यावर्षीच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतःउखडून गेला आहे.यामुळे चाळीस वर्षांपासून सुरू असणारी औसा-लातूर-सेलू ही बस पहील्यांदाच बंद झाली होती.तसेच फसलेल्या बसला ट्रक जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.यात सदर रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून ५४८ बी.हा क्रमांक दिला आहे.मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे असणारे दुर्लक्ष आणि या रस्त्यासाठी मा.आ.आर.टी.देशमुख यांचा असणारा पाठपुरावा यामुळे देशमुख यांचे आभार मानले जात आहेत.योगेश्वरी शुगरच्या माध्यमातून करण्यात आलेला रस्ता परिसरातील नागरिकांवर आनंददायी क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.यावेळी या रस्त्याचे काम शेतकी अधिकारी डी.आर.मोकाशे,प्रशासन अधिकारी राजकुमार तौर,मा.सरपंच अँड.शिवाजी हारकाळ,अनुसया कन्ट्रक्शनचे रमेश सोळंके,मोहन देशमुख,प्रकाश कदम,वरिष्ठ लिपिक सोमेश्वर सिताफे यांनी या रस्त्यास भेट देऊन पाहणी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...
COMMENTS