*तहसीलदार डॉ.आशीषकुमार बिरादार शेतकऱ्यांच्या मदतीला धावले*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील वाढीव मंडळास तहसीलदार डॉ.आशीषकुमार बिरादार यांच्या अथक परिश्रमाने मंजुरी मिळाली आहे.यात दोन मंडळे व आठ तलाठी सज्जास वाढीव मंजुरी मिळाली असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.मात्र मागील अनेक दिवसांपासून सोनपेठचे मंडळअधिकारी पद रिक्त असल्याने तहसीलदार डॉ.आशीषकुमार बिरादार यांच्या प्रयत्नातून ४ जून रोजी मंडळअधिकारी म्हणून एकलिंगे यांची नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांची असंख्य कामे मार्गी लागली आहेत.यात एकलिंगे यांनी प्रलंबित असणारी १००० फेरफार मजूर करुन आपल्या कामाचा पायंडा पाडला आहे.सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणारे कर्मचारी अशी त्यांच्या कामाची नवीन व्याख्या तयार झाली आहे.यासह बक्षीसपत्र,गहाणखत,पंचनामे,यासह विविध जबाबदाऱ्या एकलिंगे यांनी पार पाडल्या आहेत.सोनपेठ तालुक्यात असणाऱ्या दोन मंडळअधिकाऱ्यांपैकी मंडळअधिकारी विलास वाणी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने व दुसरे मंडळअधिकारी देवेंद्रसिंह चंदेल यांच्या वैद्यकीय रजेच्या कारणाने सोनपेठमध्ये मंडळअधिकारी यांचे पद रिक्त होते.यामुळे शेतकऱ्यांचे असंख्य कामे रखडली असल्याने ऐन पेरणीच्या दरम्यान शेतकऱ्यांची फजिती होत होती.या बाबीस तहसीलदार डॉ.बिरादार यांनी गांभीर्याने घेऊन वरिष्ठ कार्यालयास याची वारंवार माहीती देऊनही सोनपेठसाठी मंडळअधिकारी देण्यात येत नव्हते तब्बल चार महिन्यापासून सोनपेठचे मंडळअधिकारी पद रिक्त होते.यानुसार तहसीलदार डॉ.आशीषकुमार बिरादार यांनी तत्काळ निर्णय घेऊन मंडळअधिकारी म्हणून एकलिंगे यांची नियुक्ती करण्यात आल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS