नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
आज ६ जूनला २०२१ सकाळी ९ वाजता अंबुलगा (बु) ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. अंबुलगा नगरीतील या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक दिगांबर पाटील अंबुलगेकर, व्यंकटराव गुरुजी कलेटवाड, नवनिर्वाचित सरपंचाचे प्रतिनिधी हुल्लाजी मामा रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील ,प्रतिष्ठित व्यापारी बाबूसावकार उलीगडे, ग्रामपंचायत संगणक परिचालक शैलेश गंदिगुडे , ग्रामविकास अधिकारी प्रवीण बारमाळे सर्व ग्रा.प.सदस्य ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयघोष करण्यात आला

COMMENTS