नांदेड. (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, सर्व आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना 'बाधित' रूग्णांसाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड तसेच 'भाजप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने पाच जून रोजी विष्णूपुरी, नांदेड येथील 'सहयोग' सेवाभावी संस्थेत उपरोल्लेखित कोरोना योध्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार हे बोलत होते.
या समारंभास नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आ. राम पाटील रातोळीकर यांच्यासह 'भाजपा'चे महानगराध्यक्ष प्रविण साले, 'भाजप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे, डॉक्टर्स 'सेल'चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य देशमुख, डॉ. शितल भालके, विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, बालाजी पुयड, मोतीराम पाटील, संजय पाटील घोगरे, जे. ई. गुपिले, दिलीपसिंघ सोडी, वैजनाथ देशमुख, धीरज स्वामी व अभिषेक सौदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते विष्णूपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, डॉ. कपिल मोरे, डॉ. संजोत गिरी, डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. ओम दमकोंडवार, डॉ. अभिजित देवघरे, डॉ. मुकूंद कुलकर्णी,
डॉ. पी. एन. कदम, मेट्रन आपटे मॅडम, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, ज्ञानेश्वर देशमुख, स्टाफ नर्स सुलभा गिते, नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, डॉ. सचिन चांडोळकर, डॉ. सतिश लटुरीया, डॉ. सतिश सिंघल, डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. संजय मोरे यांचेसह सुरक्षा रक्षक सखाराम कुलकर्णी, मेट्रन शोभा चरडे, जयश्री वाघ, लॉयन्स क्लबचे एड. दिलीप ठाकूर, 'हैप्पी' क्लबचे महम्मद सोएब, 'एफडीए'चे औषधी निरीक्षक माधव निमसे, आशा वर्कर्स अनुक्रमे- मुक्ता वाघमारे, धोंडूबाई कांबळे, अंगणवाडी सेविका रेखा भोळे, अर्चना थोरात, औषध निर्माता शिवप्रसाद कुबडे, तंत्रज्ञ मधुकर काळे, वार्ड बॉय नागेश भोसले, अंबादास भोसले तसेच पोलीस कर्मचारी अजहर शेख व मुजीब शेख आदी कोविड योध्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यंकटराव मोकले, मोहनसिंह तौर, शंकर मनाळकर, दिगांबर लाभशेटवार, संतोष कदम, बजरंगसिंह परिहार, हरभजनसिंग पूजारी, संदीप कराळे, संतोष क्षीरसागर, बालाजी शेळगावकर, अभिलाष नाईक, रूपेश व्यास, जयप्रकाश येवले, शैलेश ठाकूर, गजानन उबाळे, विश्वंभर शिंदे, लाकडोजी पाटील, दशरथ कदम, संदीप पावडे, आशुतोष धर्माधिकारी, अधितोष जोशी, भारत पाटील, हिरामण देशमुख, भारत यादव, शिवा गिराम व अनिल हजारी आदी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती
.
प्रास्ताविक उपरोक्त कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बालाजीराव गिरगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य व्ही. बी. भरकड, प्राचार्य दत्तात्रय घारगे, विश्वनाथ स्वामी, प्राचार्या डॉ. गझला खान, प्राचार्य सुनील हंबर्डे, प्राचार्य शिवानंद बारसे, प्रा. अनिल सोनटक्के, प्राचार्य सुनील पांचाळ, राजेश हंबर्डे, रवी सुतवणे, योगेशसिंह ठाकूर, मारोती मोरे, पांडुरंग आखरे, कोंडीबा सपुरे, धारोजी हातागळे, रामा लूटे, धोंडीबा वाघमारे, पांडुरंग कोंपले, सुनील हिवंत, सचिन सूर्यवंशी, शंकर किरकण व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS