दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम फलक सर्व पोलीस स्थानकात उपलब्ध करून द्यावेत बीड पोलीस अधीक्षकांचे सर्व पोलीस प्राधिकरणास सक्त आदेश.
अनंत जाधव /मस्साजोग -
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या तरतुदी नमूद आहेत.परंतु या तरतुदींची माहिती कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना नसल्याने दिव्यांग व्यक्तींच्या त्रासांमध्ये व्यापक भर पडत आहे.म्हणून सदर तरतुदींची माहिती कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना झाल्यास दिव्यांग व्यक्तींशी त्यांचे सद्वर्तन राहील. ही बाब विचारात घेऊन दिनांक 08 जानेवारी 2019 रोजी माननीय दिव्यांग आयुक्तालय दिव्यांग कल्याण पुणे यांनी राज्यातील सर्व शासकीय प्राधिकरणाच्या दर्शनी भागावर दिव्यांग हक्क अधिनियमाचे फलक उपलब्ध करून देण्याबाबत आदेशित केले आहे . या आदेशास अनुसरून दिनांक 18/02/2021 रोजी शासन मान्यताप्राप्त दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक आठवले यांच्या निवेदनास अनुसरून जिल्हाधिकार्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आठवले यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्याने सदर विषयाच्या अनुषंगाने सद्यस्थितीत केवळ जिल्हाधिकारी कार्यालय बीड, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बीड व जिल्हा परिषद बीड या कार्यालयाच्या दर्शनी भागावर फलक उपलब्ध आहेत असे आठवले यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु उर्वरित सर्व कार्यालय प्रमुखांनी या आदेशाचे पालन केले नाही, अशी गंभीर बाब आठवले यांनी निदर्शनास आणून दिल्याने सदर बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करून दिव्यांग आयुक्तालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सर्व कार्यालय प्रमुख यांना आदेशित केले होते. माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश विचारात घेऊन दिनांक 08/03/2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत आर.राजास्वामी यांनी त्यांच्या नियंत्रणातील सर्व पोलीस प्राधिकरण व सर्व पोलीस स्थानक प्रमुख यांना दिनांक 15/03/2021 अखेर सर्व पोलीस स्थानकाच्या दर्शनी भागावर व तत्सम पोलीस प्राधिकरणाच्या दर्शनी भागावर या अधिनियमाचे फलक उपलब्ध करून देण्याचे समर्पक आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही प्राधिकरणाने कसूर करू नये असेही या आदेशात म्हटले आहे. या स्वरूपाची माहिती दिव्यांग व्यक्तींच्या हितार्थ संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
सोबत : जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांचे दि:08/03/2021 रोजीचे समर्पक आदेश सादर.

COMMENTS