*अनंत जाधव /मस्साजोग -*
*केज तालुक्यातील कोरेगाव येथील अंगणवाडी मदतनीस उर्मिला प्रल्हाद पायाळ*
*यांनी स्वतःचा जिवधोक्यात घालून वाचवला एका चौदा वर्षिय मुलाचा जिव वाचवल्या बद्दल कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ६ मार्च शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता सत्कार करण्यात आला *
अधिक माहिती अशी की कोरेगाव येथील एक चौदा वर्षांचा मुलगा दिनांक 3 मार्च बुधवार रोजी घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडिलांना मदत करून पैसे मिळवून देण्यासाठी आई वडिलांन बरोबर शेतात कामाला गेलेला इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला मुलगा
वैभव बळीराम लांब त्याचा भाऊ हे दोघे जण पिण्याचे पाणी संपले होते म्हणून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहीरीवर गेले असता वैभव हा विहिरी मध्ये पाणी काढण्यासाठी उतरला असता त्याचा पाय घसरला व विहिरीत पडला व त्याला पोहता येत नसल्यामुळे तो मोठ्याने ओरडत ओरडत वाचवा वाचवा म्हणू लागला पण सोबत असलेल्या भावाला पण पोहता येत नसल्यामुळे तो पण मोठ्याने ओरडला असता त्याचा ओरडण्याचा आवाज शेजारच्या शेतात रोजंदारी वर काम करत असलेल्या उर्मिला प्रल्हाद पायाळ या अंगणवाडी मदतनीस ला आवाज ऐकू गेला असता त्या मदतनीस इकडे तिकडे न पाहता विहीरीकडे धाव घेतली असता तीला तो मुलगा बुडत असताना दिसला व त्या अंगणवाडी मदतनीस ने स्वातःच्या जिवाची पर्वा न करता तिने विहिरीत ऊडी मारली व वैभवचा जिव वाचवला असता कोरेगाव येथील सरपंच बालासाहेब तांदळे , सतीश घुले,निलुबा लांब,शिवराज लांब ,पत्रकार अनंत जाधव ,संघपाल सोनवणे मस्साजोग विभागाच्या पर्यवेक्षीका श्रीमती गिते मॅडम यांच्या हस्ते,उर्मिला प्रल्हाद पायाळ या अंगणवाडी मदतनीस यांना साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका सुवर्णमाला तांदळे, सुमित्रा मुंडे, आम्रपाली धिवार,व कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता सारसकर, शिक्षिका मोरे कल्फा, आशा पाळवदे, प्रतिभा भडके,खरोट आशा,व विनायक मुंडे , काजल शिनगारे, लक्ष्मण शिनगारे इत्यादी च्या व गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत उर्मिला पायाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला

COMMENTS