कुंटू
र येथे विविध ठिकाणी उत्कृष्ट महिलांचा सन्मान
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील विविध कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी कुंटूर येथील शांती निकेतन माध्यमिक विद्यालयच्या वतीने सर्व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला .
विशेष म्हणजे एकंदरीत सर्वत्र शाळेतील प्रकार व परिस्थिती पाहतांना. आपली शाळा सुरक्षित राहावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी शांतीनीकेतन शाळेत सी सी टि व्हि कॅमेरे बसविण्यात आले आहे असे माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदर शाळचे पाटील हे होते. तर कुंटूर येथील ग्रामपंचायत सदस्या भोसले राधाबाई नागोराव, बचत गट प्रमुख रेखाताई अनिल कांबळे, पोलीस कांसटेबल महिला, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, मुख्याध्यापिका , यांचाही जागतिक दिनाच्या औचित्याने सत्कार करण्यात आला.यावेळी मु. अ. पाटील एम व्ही, वडजे सर, भुसेवार सर, शिंदे सर, मोरे सर, मदनूरकर सर, महादळे सर, पाटील एस व्ही, पांडे सर, पाटील एल. एम ,मानेवर, प्रकाश सोनटक्के सर,
कुंटूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवक राजेश दमकोंडलवार, ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी कुंटूर येथील बरबडा येथील विद्यार्थिनी कावेरी हिने आसाम रायफल या सैनिक मध्ये भरती झाल्यानंतर त्या महिलांचा प्रथमच सत्कार करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच आशाताई कदम ग्रामपंचायतीचे सर्व महिला सदस्य आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका तसेच शिक्षिका पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS