आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील पिंपरीआष्टी,केळसांगवी,धिर्डी हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बनवलेला आहे. या रस्त्यावर ठेकेदाराने काम करतांना डांबराचा अत्यंत कमी वापर केल्यामुळे हा रस्ता सहा महिन्यांत जागोजागी उखडला आहे. सदरील रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवला गेला आहे तरी पंधरा दिवसांच्या आत चांगल्या दर्जाचा तयार करावा अशी मागणी युवा नेते भाऊसाहेब घुले यांनी केली आहे.
प्रधानमंत्र्याच्याच योजनेला डच्चू प्रधानमंत्र्यांच्या नावानेच सुरू असलेल्या सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रधानंत्र्यांच्याच योजनेला डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत.
पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत आष्टी पिंपरी केळसांगवी ते धिर्डी रस्त्याचे चे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तरी पंधरा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त करण्यात यावा नसता ग्रामस्थ ऊपोषण करण्याच्या तयारीत आहेत. गणेश पडोळे महादेव बोराडे, सतीश घुले, गणेश घुले अशोक करडूळे यदु कडूळे भाना भाऊ पडोळे व इतर ग्रामस्थांना घेऊन उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब घुले यांनी सांगितले.


COMMENTS