सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दिलासादायक असणारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या सरकारच्या माध्यमातून तीन महिने होऊनही कोणतीही कंपनी नियुक्त करण्यात आली नसल्याने बंद आहे.ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातील अपघातग्रस्त मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये विमा दिल्या जातो.तसेच अपघातात शरीराचा कोणताही अवयव निकामी झाल्यास यासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून दोन लाखाची मदत करण्यात येते.मात्र या सरकारला स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा विसर पडला आहे का?असा सवाल सोनपेठ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मुन्ना बिराजदार यांनी उपस्थित केला आहे.यासाठी शासनस्तरावर ही योजना चालू नाही झाल्यास आंदोलन करण्याचा निर्धारही बिराजदार यांनी व्यक्त केला आहे.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत ९ डिसेंबर २०२० रोजी संपली आहे.त्यानंतर या योजनेसाठी १० डिसेंबर पासून कोणतीही विमा कंपनी कार्यान्वित केली नसल्याने हजारो शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा निर्वाळा बिराजदार यांनी देत या सरकारला शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीपासून वंचित ठेवायचे आहे का?असा सवालही उपस्थित केला आहे.

COMMENTS