प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी सप्ताह एक मार्च ते सात मार्च या कालावधीत साजरा केला जातो.या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील सर्व जनऔषधी केंद्रांमधून...
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी सप्ताह एक मार्च ते सात मार्च या कालावधीत साजरा केला जातो.या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील सर्व जनऔषधी केंद्रांमधून रक्तदाब तपा सणी,रक्तातील शर्करा तपासणी, मोफत मास्क वितरण,सॅनिटरी पॅडचे वितरण,या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या सप्ताहाची सांगता रविवार दि.सात मार्च रोजी मा.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, चित्रलेखा डायग्नॉस्टिक सेंटर च्या खाली,डॉक्टर लेन,नांदेड येथे करण्यात आली.या प्रसंगी केंद्राचे संचालक प्रशांत सितावार, डाॅ.गिरीश सितावार,सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब इंगळे तसेच नांदेड तालुक्यातील इतर जनऔषधी केंद्र संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS