श्री मंगलनाथ मल्टिस्टेट येथे महिला दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी (माजलगाव):- येथील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य श्री मंगलनाथ मल्टिस्टेट को ऑपेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव येथे महिला सक्षम विभागाद्वारे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले ...
संस्थेच्या संचालिका सौ. जयदेवी रामेश्वर कानडे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना संस्थेद्वारे ३००० महिलांना महिला सक्षम विभागाद्वारे प्रत्यक्षरित्या रोजगार मिळण्यासाठी पतपुरवठा केला असल्याचे सांगून, या पतपुरवठा द्वारे महिलांनी आपला व आपल्या कुटुंबाचा विकास करावा असे सांगितले तसेच, महिला सक्षम विभागाद्वारे ज्या महिलांनी आपले व्यवसाय यशस्वीरीत्या उभारले त्यांचा सत्कार केला आणि आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत कार्यालयीन कामकाज करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा देखील यावेळी उपस्थित कर्मचारी यांनी सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या प्रा. सौ. उषा रत्नपारखी मॅडम, सौ. विजया देशमुख मॅडम, सौ. टाले मॅडम,सक्षम विभाग प्रमुख श्री. बाबुराव खोदानपुरे, शाखा व्यवस्थापक श्री विकास पाटील हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. चाळक ज्ञानेश्वर, श्री. मधुकर गायकवाड, श्री. गणेश कदम,श्री. विक्रम गरुड, श्री. गणेश वैगुंडे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS