*गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह..?*
केज ! प्रतिनिधी.
*केज पंचायत समिती मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.पुन्हा एकदा तीन दिवसांपासून दांडीबहाद्दर कर्मचार्यामुळे केज पंचायत समिती चांगलीच चर्चेचा विषय बनली आसून दांडीबहाद्दरांना कसलीच सूचन केजचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे देत नसल्याने त्यांच्यच कारभारावर नागरीकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.त्यामुळे सिईओ कुंभार साहेब आपणच केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेसन घालाण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.*
केज पंचायत समिती मागील तिन दिवसांपासून दांडीबहाद्दर कर्मचार्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आसून 56 कर्मचारी कार्यरत असलेल्या केज पंचायत समितीत केवळ 10 % कर्मचारी उपस्थित असतातात तर 90 % कर्मचारी दांडीबहाद्दर असून देखिल उपस्थितीती रजिस्टरवर उपस्थितीत असल्याचे शुक्रवारी समोर आल्यानंतर येथिल संतप्त कार्यकर्त्यांनी दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले होते.त्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी यापुढे गैरहजर राहणाऱ्या कर्मचार्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा ईशारा देखिल दिला आहे.
दरम्यान केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंनी अद्यापपर्यंत दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कसलेच ठोस पाऊल उचलले नसल्याने गटविकास अधिकार्यांच्या कारभारावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.त्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनीच केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना वेसन घालावी अशीच मागणी होताना दिसत आहे.

COMMENTS