केज / प्रतिनिधी
केज तालुक्यात नावाजलेल्या व सदैव अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आदर्श पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अशोक बापू सोनवणे यांची निवड प्रा. हनुमंत भोसले सर यांच्या अध्यक्षतेखाली केज विश्रामगृह येथे बैठक घेऊन सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव पदी वरिष्ठ पत्रकार गौतम बचुटे यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या धारदार लेखनीने अनेक वेळा अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडुण सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला आहे. तर कार्याध्यक्ष पदावर सौ. रत्नमाला ताई मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. महिलांना न्याय तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सम्रद्ध करण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी पाठलाग वर्तमान पत्राच्या माध्यमातून अनेक प्रकारणाचा पाठपुरावा करून सर्व सामान्य व वंचित घटकांना न्याय देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आदर्श पत्रकार संघ केज तालुक्यात नेहमीच सांस्कृतिक तसेच जलसंधारण व सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा पत्रकार संघ आहे. आदर्श पत्रकार संघाला फार मोठा इतिहास आहे. व दरवर्षी केज शहरात दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हेच कार्य पुढे नेण्यासाठी नुतन अध्यक्ष व नवीन कार्यकारिणी प्रयत्न करेल अशी सर्व सामान्य केज शहरातील व तालुक्यातील जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. मागील अध्यक्ष विजयराज आरकडे, धनंजय देशमुख, धनंजय कुलकर्णी, शिवदास मुंडे, प्रकाश मुंडे, बाळासाहेब जाधव , धनंजय घोळवे, शुभमजी खाडे, प्रविण देशमुख सर, महादेव काळे. अनंत जाधव. साखरे सर, ऊतरेश्वर शिंदे व सहकारी पत्रकार बांधव आजच्या मिटींगला उपस्थित होते. सर्वांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

COMMENTS