सारणी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
केज प्रतिनिधी :
केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे दि.२२ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९१ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लांजा येथील पाटलाने एका महिलेची अब्रू लुटली असता त्याचे हात , पाय कलम करून त्याला फासावर लटकविले तसेच आपलाच मावळा जेव्हा दुश्मनाच्या स्रीची अब्रू लुटतो आणि महाराजांकडे मोठ्या थाटात केलेली कामगिरी सांगण्यास येतो तेव्हा महाराजांनी त्याचे हात पाय कलम करून त्याला कारागृहात बंदिस्त करण्याची शिक्षा ठोठावतात, तो आपला मावळा आहे म्हणुन त्याला माफी दिली जात नाही. कारण त्याचे कृत्य हे लज्जास्पद आणि संपुर्ण मानव जातीला कलंकीत करणारे असल्याने त्याला शिक्षा दिली हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले म्हणुन त्यांचे स्वराज्य हे सुराज्य घडले. म्हणुन ते जगातील सर्वोत्तम राजे आहेत. तसेच शेतकरी हा त्यांच्या राज्यातील केंद्रबिंदु होता. असे मनोगत ह.भ.प. शिवव्याख्याते अविनाश महाराज भारती यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बिनगीर बाबा संजिवन समाधी मठ संस्थानचे मठाधिपती शंकरानंद गिरी महाराज , मा.पं.स. सभापती तथा भाजपाचे जेष्ट नेते दत्तोबा भांगे, विडा जि.प.गटाचे सदस्य विजयकांत मुंडे , शेकापचे मध्यवर्ती सदस्य भाई मोहन गुंड, पं.सं.सदस्य पिंटू ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे , मनसे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस , भाजपा केज ता.अध्यक्ष भगवान केदार , मनसे केज ता.अध्यक्ष कल्याण केदार , शिवसंग्राम बीड जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव , बालासाहेब ठोंबरे , सांगळे , हांगे , पो.उपनिरिक्षक अनंत घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला लहान , थोर , युवक तसेच महिला यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यावेळी गुणवंत तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले. यावेळी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे , मनसे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस , भाजपा केज तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी शिवछत्रपतीं विषयी आपले विचार प्रगट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विजय घोळवे यांनी केले. तसेच उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले.
जो पर्यंत सुर्य-चंद्र आहेत तो पर्यंत नव्हे तर जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असेल तो पर्यंत सुर्य-चंद्र असतील. हे ही अविनाश महाराज यांनी आवर्जून सांगितले. तर शेवटी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे आभार मानले.

COMMENTS