*दैनिक प्रतिवीर बीड तथा महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य (सो.) च्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न:

बीड /प्रतिनिधी:  बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या ठिकाणी दैनिक प्रतिवीर बीड तथा महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य क...


बीड /प्रतिनिधी:

 बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या ठिकाणी दैनिक प्रतिवीर बीड तथा महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन दैनिक प्रतिवीचे मुख्य कार्यकारी संपादक मारुती (संतोष) गवळी , बीड जिल्हा आवर्तीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.जावेद शेख यांच्या शुभहस्ते फित कापुन कार्यालाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी दैनिक प्रतिवीरचे मुख्य संपादक चंद्रशेखर (दादा) गायकवाड , दैनिक प्रतिवीर बीड आवर्तीचे उपसंपादक गोविंद शिनगारे , कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी केज तालुका झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दशरथ चवरे , सचिव श्री .दत्तात्रय हांडीबाग ,केज तालुका पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय मुजमुले , छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे ,आदरणीय तांदळे तात्या , केज सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते श्री निखिल बचुटे , संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक , मांजरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण खोडसे , यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय चंद्रशेखर दादा गायकवाड यांच्या शुभहस्ते श्री . प्रतिमेचे पूजन करण्यात आले  

*मा. श्री चंद्रशेखर दादा गायकवाड मुख्य संपादक दैनिक प्रतिवीर तथा संस्थापक अध्यक्ष संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा केज येथे विविध संघटनांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला*

 दैनिक प्रतिवीर बीड जिल्हा तथा महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी केज नगरीत संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रशेखर दादा गायकवाड , कार्याध्यक्ष मा.मारुती (संतोष) गवळी , मा.विरल गायकवाड यांचा विशेष सत्कार समारंभ केज तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाच्या वतीने वतीने अध्यक्ष दशरथजी चवरे , सचिव दत्तात्रय हंडीबाग व झुंजार पत्रकार संघ केजचे सर्व पदाधिकारी यांनी दैनिक प्रतिवीरचे सर्वेसर्वा व संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर दादा गायकवाड यांना विशेष सन्मानचिन्ह , शाल , पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय मुजमुले , सचिव रंजित घाडगे , पदाधिकारी पत्रकार वैरागे बापु , पत्रकार गव्हाणे भैय्या, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे , संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक , सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते निखिल भैय्या बचुटे , मांजरा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण खोडसे , यांच्यासह केज तालुका पत्रकार सर्वश्री अनिल गलांडे ,मनोराम पवार , नंदकुमार मोरे , रमेश इथापे , अशोक भोसले , श्रीराम तांदळे , वाजेद शेख या सर्व पत्रकार बांधवाच्य हस्ते मा. चंद्रशेखर (दादा) गायकवाड यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला तसेच दैनिक प्रतिवीर चे कार्यकारी संपादक संतोष गवळी सर यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन दैनिक प्रतिवीर बीड जिल्हा आवर्ती पत्रकारांच्या वतीने उप-संपादक गोविंद शिनगारे , जिल्हा प्रतिनिधी प्रा.जावेद शेख , बीड प्रतिनिधी शहाजी भोसले , केज प्रतिनिधी शरद लोंढे , धारूर प्रतिनिधी प्रा.अविनाश जगताप , जय खाडप यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी पाहुण्याचा सत्कार करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या पंचक्रोशीतुन आलेल्या विविध पत्रकार संघटना व पत्रकारिता बांधव यांनी दादांचा व गवळी सर यांचा सत्कार केला .या वेळी जणू काही एक संस्कृतच्या म्हणी प्रमाणे "अतिथी देवो भव "असे या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी वाटत होते यावेळी केज तालुक्यातील विविध सामाजिक संघटना , पत्रकार संघटना , सामाजिक कार्यकर्ते यांनी दादांचा सत्कार केला या नंतर प्रास्ताविक व मनोगत प्रा.जावेद सरांनी व्यक्त केले .मनोगत व्यक्त करत असताना प्रा.जावेद सरांनी म्हटले की दादांचा हा प्रेमळ स्वभाव त्यांनी दिलेले या जगात विसरण्यासारखे नाही. समाजामध्ये वावरत असताना मी अनेक सामाजिक ,राजकीय, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती पाहिले पण दादा आपल्यासारख्या देव माणसाला मी आजपर्यंत पाहिले नाही .दादा आपले मनोगत व्यक्त करण्या करता मी खूप छोटा आहे . या समाजत आपल्यासारख्या व्यक्तीचे मनोगत व्यक्त करण्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतील. मी आपले मनोगत व्यक्त करणे म्हणजे "लहान तोंडी मोठा घास "अशीच परिस्थिती माझ्या समोर निर्माण झाली आहे .

      दादांचा आणि माझा परीचय मागील दोन -तीन महिन्यापासूनच आहे परंतु दादांचा आणि आपल्या बीड जिल्ह्यातील प्रतिनिधीचा संबंध एक कुटुंबातील वाडीधाऱ्यांसाखा झाला आहे. दादा हे पत्रकारिता क्षेत्रातच नव्हे तर प्रशासनाच्या क्षेत्रात ही तेवढेच महान कार्य दादांच्या हातून होत आहेत. दादा आपल्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या पत्रकार बांधवांना पत्रकार वसाहत निर्माण करण्याचा मानस आहे तो खरोखरच प्रशंसा करण्या योग्य आहे. कारण पत्रकारांच्या कुटुंबाना लागणारी महत्वपूर्ण गरज ही घराची असते जेमतेम पत्रकार जीवन जगत असतो परन्तु त्याला त्याच्या कुटुंबाला एक हक्काचे घर उभा करणं हे अश्यक्यच असते आसे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

  दादा तुमच्या सारख्या महान व्यक्तीचे मनोगत व्यक्त करताना माझे डोळे भरून आले कारण अश्या व्यक्तिची साथ मिळण्यास खूप उशीर झाला असे मला वाटत आहे अश्या व्यक्तीचा परिचय व सहवास जर का मला एक पाच दहा वर्षापूर्वीच मिळाला असता तर आमच्या विचारला खरोखरच न्याय मिळाला असता .पण जाऊ द्या.आणखीन ही वेळ गेली नाही. दादा आपण आम्हाला आपल्या परिवारात सामील करून घेतले त्याबद्दल आम्ही तुमचे ऋण कधी फेडू याची खंत आमच्या मनात नेहमी आसेल ,दादा या बीड जिल्ह्यतील आपल्या दैनिक प्रतिवीर प्रत्येक घराघरात कसा पोहचेल यासाठी आम्ही बीड जिल्हा चे संपूर्ण प्रतिनिधी एक जिवाने कार्य करून येथील असण्याऱ्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम हा आपला परिवार करीलअसे मत प्रा.जावेद सर यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले.त्यानंतर झुंजार पत्रकार संघाचे सचिव दत्तात्रय हंडीबाग सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असतातना त्यांनी सांगितले की आपला हा झुंजार पत्रकार संघ आपल्या संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सावली खाली संलग्न करून घेण्याची विनंती केली व दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची ग्वाही दिली यानंतर पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय मुजमुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दैनिक प्रतिवीर तथा संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य हा परिवार नवतरुण पत्रकारांना मार्गदर्शक आसेल व दादांसारखे मार्गदर्शक मिळणे हे खुप नशीबवान पत्रकारांचे भाग्य आहे असे मत मांडुन शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते निखिल बचुट यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.  

यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना

*उपस्थितांना मास्क वाटप कार्यक्रम* 

-----------------------------------कोरोनाच्या या वाढता प्रादुर्भाव पाहता आपला ही काही समाज कार्याला हातभार लागावा म्हणून आलेल्या सर्व उपस्थित पाहणे व पत्रकार बांधव यांना मास्क वाटप करण्यात आले. कोविडच्या नियमांचे पालन करा व आपल्या जीवाला व आपल्या परिवाराला सांभाळा असा संदेश ही दैनिक प्रतिवीर चे उपसंपादक गोविंद शिनगारे यांनी दिला.

-----------------------------------

*दैनिक प्रतिवीर कार्यालयात शिवजयंती ही झाली साजरी*

-----------------------------------

नवनिर्वाचित कार्यलयाचे उद्घाटन झाल्या नंतर लागलीच या कार्यालयात प्रा.जावेद शेख सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी आदरणीय दादा व संतोष गवळी सर व विरल भैय्या ,व बीड जिल्ह्यातील प्रतिवीर चे उपसंपादक गोविंद शिनगारे ,शहाजी भोसले , शरद लोंढे व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

   -------------------------------- शेवटी अध्यक्षीय समारोप करत असताना दादांनी म्हणाले की पत्रकारांनी निर्भीड व न्याय देणारी पपत्रकारिता करावी.दादांनी या वेळी त्यांनी पत्रकारासाठी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला .व येणाऱ्या काळात माझा पत्रकार बांधवांना त्यांच्या करत असलेल्या पावती म्हणून संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना आपल्याला एक हक्काचे घर म्हणून पत्रकार वसाहतिच्या माध्यमातून पूर्ण करील अशी ग्वाही दादांनी दिली .सर्व पत्रकारिता करणारे पत्रकारांनी निर्भीड व न्याय देणारी पत्रकारिता करावी कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे . लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज च्या काळात पत्रकार बांधवांची गरज भासत आहे. तरी सर्व पत्रकारांना दादांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक प्रतिवीर चे उपसंपादक तथा संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य चे सहसंघटक गोविंद नाना शिनगारे यांनी केले शिनगारे यांनी सूत्रसंचालन करत असताना दादांच्या कार्य व दादा कसे आहेत याची परिचिती वेगवेगळ्या चारोळ्याच्या माध्यमातून करत असताना नाना म्हणाले *"सफर में मुश्किलें आऐ,तो आप जैसे व्यक्ती से हिम्मत और बढती है , कोई अगर रास्ता रोखे तो जरुरत और बढती है ,आगर बिकने पे आ जावो तो घट जाते है दाम अक्सर ..ना बिकने का इरादा हो तो , कीमत और बढती है"* वरील चारोळीप्रमाणे दादा तुमचे कार्य आम्हां सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे याप्रमाणे बीड जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका असलेल्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरुपाचे औरंगाबाद विभागीय दैनिक प्रतिवीर तथा संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचा शुभारंभ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटनेचे प्रदेश सचिव श्री प्रदीप कुलकर्णी , राज्य कार्यकारिणीतील प्रमुख संघटक श्री .सिद्रामआप्पा पाटील , प्रदेश उपसचिव श्री विलास मस्के , श्री.बाळासाहेब साळुंके , कोल्हापूर विभागीय अध्यक्ष श्री.रुपेश सुतार , लातुर विभागीय अध्यक्ष श्री . दत्तात्रय परळकर , बीड जिल्हा अध्यक्ष तथा बीड तालुका प्रतिनिधी शहाजी भोसले , धारुर तालुका प्रतिनिधी प्रा. अविनाश जगताप , केज तालुका शहर प्रतिनीधी शरद लोंढे , यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करुन यशस्वीपणे संपन्न झाला .

"पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांची लेखणी माता तर लेखणीतील शाई आश्रुच्या स्वरुपात असते तसेच कागद हा पीता असतो हे समोर ठेवून पत्रकाराने आपली पत्रकारिताआपल्या माता-पिताच्या स्वरुपात  

जोपासली पाहिजे "

-- *मा. श्री चंद्रशेखर दादा गायकवाड*

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group