आष्टी (दादासाहेब बन)
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे नेतृत्व कथा बीड लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांचे सुरुवातीपासून कट्टर समर्थक म्हणून अजित दादा घुले यांची ओळख निर्माण झालेली आहे. कडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवारी अजित घुले यांना देण्यात यावी अशा मागणीला युवक वर्गातून चर्चेला जोरदार मागणी होत आहे. केळसांगवी गावचे सरपंच तेे आष्टी तालुका अध्यक्ष ,बीड जिल्हा उपाध्यक्ष अशी पदे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाने अजित घुले यांनी योग्यप्रकारे संभाळली असून परिसरामध्ये अजित घुले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवक संघटन निर्माण झालेले आहे .आ. सुरेश धस यांच्या कोणत्याही कामामध्ये अजित घुले मोठ्या धाडसाने व हिमतीने त्यांच्यासाठी काम करीत असून अशा धाडशी संघटनशील त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या युवक नेतृत्व अजित दादा घुले यांना आमदार सुरेश आण्णा धस यांनी कडा घाटातून जिल्हा परिषद ची उमेदवारी देऊन काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी अजित दादा घुले मित्र परिवाराकडून होत आहे.

COMMENTS