केज/प्रतिनिधी
तालुक्यातील पाथ्रा ग्रामपंचायतची निवडणूक ही १५ जानेवारी रोजी पार पडली. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक ही १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या सरपंच पदाच्या निवडीत सौ.अपर्णाताई प्रविणराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अपर्णा ताईंच्या नवडीबद्दल पंचक्रोषीतून अभिनंदन केले जात आहे.
पाथ्रा या ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासुन ज्येष्ठनेते प्रविणराव पवार यांची व त्यांच्या सहकार्यांची निर्विवाद सत्ता राहिलेली आहे. या निवडणूकीत कौटूंबिक अडचण असताना सुद्धा ग्रामस्थांनी त्यांना निवडणूक लढवावी अशी विनंती केली. त्यानुसार प्रविणराव पवार
यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत प्रविणराव पवार गटाचे चार सदस्य हे निवडून आले तर विरोधी गटाला केवळ तीन जागा मिळाल्या. परंतु बहुमताच्या काठावर असताना सुद्धा ही निवड चुरशीची आणि रंगतदार झाली.
१५ फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला. परंतु त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. या निवडीत प्रविणराव पवार यांच्या अर्धांगिणी सौ.अपर्णाताई पवार यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची बातमी कळताच गावातील समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सरपंच सौ.अपर्णाताई या उच्च विद्याभुषीत आणि पदवीधारक असल्याने ग्रामस्थांच्या अडीअडचणींची व प्रश्नांची जाणीव आहे. येणाऱ्या काळात विकासाच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल. अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच सौ.अपर्णाताई पवार यांनी दिली.
त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, आ.संजयभाऊ दौंड, माजी आ.पृथ्वीराज साठे, बीड जि.प.चे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष बबन लोमटे व पंचक्रोषीतून अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS