तहसीलदार साहेबांनी तत्काळ रस्त्याचा प्रश्न सोडवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा - मुकुंद कणसे केज ता. अध्यक्ष रा.यु.काॅंग्रेस
--------------------------------------------
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे सोनेसांगवी नंबर १ या गावातील शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर २१,२२,१५,२५ मधील शेतातील उत्पादन असलेला ऊस रस्ता नसल्याने जाग्यावर तसाच उभा आहे सदरील ऊस कारखान्यास घालवण्यासाठी शिवारातुन रस्ता नसल्याने लाखोंचे नुकसान शेतकऱ्यांचे होत असुन सदरील ऊसास जवळपास १३ ते १४ महिने उलटून गेले तरी अद्यापही ऊस जाग्यावरच असल्याने व ऊस कारखान्याचा गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे आणि केवळ ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सदरील निवेदनाची दखल घेऊन तहसिलदार साहेबांनी ४ दिवसांच्या आत वरील प्रकारणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ रस्ता द्यावा व तसे न झाल्यास , अन्यथा दि.२/३/२०२१ रोजी आमच्या उसाच्या शेतात आम्हां शेतकऱ्यांना आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही असे निवेदनात नमुद केले असुन यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची असले आसे जाहीर केले आहे तसेच सदरील निवेदन प्रतिलीप म्हणुन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री बीड जिल्हा , जिल्हाधिकारी बीड , उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई , पोलिस निरीक्षक युसुफवडगावं यांना ही निवेदनाची प्रत पाठवल्याचे निवेदनात नमुद केले आहे व सदरील निवेदनावर महादेव बाळासाहेब इखे , आनंत आबासाहेब कणसे , मारुती नानासाहेब कणसे , रामेश्वर शाहुराव गुळवे , शिवाजी हरीभाऊ इखे , पांडुरंग उत्तम इटकर ,चांगदेव छगण यादव या शेतकऱ्यांच्या स्वक्षरी आहेत .
COMMENTS