नांदेड,
05/02/2021
मा.डॉ.रवींद्र अंबेकर, प्राचार्य, डायट,नांदेड मा.प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाखाली डायट नांदेडचे जेष्ठ अधिव्याखाता, अधिव्याख्याता, विषयसहायक,समुपदेशक व समन्वयक यांची इ.5 ते 8 “चाचणी अंमलबजावणी व शाळा भेट” नियोजन सभा दि.05/01/2021 रोजी संपन्न झाली.
 आजच्या सभेतील काही महत्त्वाचे निर्णय –
1) शिक्षण विभाग,जिल्हा परिषद, नांदेड आणि डाएट,नांदेड यांचे शाळा भेटी साठी एकूण 7 पथके गठीत करण्यात आली आहेत. प्राचार्य,डाएट,नांदेड, शिक्षणाधिकारी प्राथमिक , शिक्षणाधिकारी माध्यमिक,शिक्षणाधिकारी मनपा, डाएट मधील ज्येष्ठ अधिव्याख्याता हे त्या त्या पथकाचे पथक प्रमुख असणार आहेत.
2) दि. 11, 12 व 13 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना पथकाद्वारे भेटी दिल्या जाणार असून भेटी दरम्यान विद्यार्थ्यांची चाचणी,वर्ग निरीक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांची सभा तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे.
3) 100% शाळेतील 100% विद्यार्थ्यांची MCQ प्रश्न प्रकाराची चाचणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
4) लिंक द्वारे चाचणीचे गुणांकन एकत्रित केल्या जाणार.
5) चाचणी अंमलबजावणी करताना शिक्षकांचे केंद्र बदलुन विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
6) चाचणीतून येणाऱ्या निष्कर्षा नुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
7) केंद्र स्तरीय शिक्षण परिषदांसाठी चाचणीचा डेटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
8) NAS वर आधारित शिक्षकांचे अध्यापन व्हावे यावर फोकस असणार आहे.
COMMENTS