माजलगांव दि .१६ ( प्रतिनिधी ) :- माजलगांव तालुक्यातील मंगरूळ.१
येथे आज राम मंदिर निर्माण अभियानाची शोभा यात्रा काढण्यात आली हि शोभा यात्रा सकाळी ७ वा.ग्रामस्वच्छता करून या शोभा यात्रेस सुरवात करण्यात आली गावातील हनुमान मंदिरासमोर दर्शन
घेऊन व श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैलगाडीतून
श्रीराम यांच्या प्रतिमे सोबत लहान मुलांना श्रीराम ,लक्ष्मण, सिता व हनुमान यांच्या वेशभूषा केशव बादाडे यांनी तयार केल्या आणि शोभा यात्रा संपूर्ण गावातील घरासमोरून निघाली प्रत्येक गावातील घरी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले गावातील
भंजनी मंडळीनी संपूर्ण शोभा यात्रेत राम नामाचा गजर केला या शोभा यात्रेच वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दारोदारी सुंदर अशी रांगोळी घरावरती भगव्या पताका
शोभा यात्रा येताच दारी त्या दारी फटाक्याच्या माळीने शोभा यात्रेचे स्वागत झाले माता भगिनींनी शोभा यात्रे
मध्ये फुगडी खेळून भक्ती मय वातावरणात शोभा यात्रे
मध्ये आपला सहभाग नोंदवला शोभा यात्रेचा समारोप समन्वयक
अनंत नागरगोजे यांनी राममंदिर निर्माण अभियानांतर्गत निघालेल्या
शोभा यात्रेतील सहभागी ग्रामस्थांचे आभार मानले तसेच निधी
संकलनाची विस्तृत माहीती गावकर्याना दिली.व शोभा यात्रेची
सांगता राम महाप्रसादाने झाली या राम महाप्रसादास संपूर्ण ग्रामस्थ
उपस्थित होते.शोभा याञा ठोल ताश्यांच्या व टाळमृदुंगाच्या गजरात
यशस्वितेसाठी पांडुरंग बापमारे सर,विलासराव घाटूळ,शेषेराव होके,राम घाटूळ,भाऊसाहेब घाटूळ, किसनराव बापमारे,बलभीम बापमार लक्ष्मण बापमारे,आसाराम घाटूळ,प्रल्हाद घाटूळ,केशव घाटूळ
कानंता घाटूळ,दत्ता घाटूळ,संजय थळकर, रामेश्वर थळकर प्रदीप घाटूळ,
रंगनाथ काळे,भगवान बापमारे,अनंत शिंदे,मुरलीधर घाटूळ,विष्णू घाटूळ,
धर्मराज महाराज,भुजंगराव घाटूळ,विष्णू घाटूळ,महादेव बापमारे,रामेश्वर बापमारे,
कृष्णा बापमारे, अविनाश येळंबकर, आडे सर आदिंनी प्रयत्न केले व शोभा यात्रा यशस्वी केली.

COMMENTS