तुळजाभवानी अर्बनच्या महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद शेकडो गरजू महिलांनी घेतला लाभ

माजलगाव/प्रतिनिधी            तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचा वर्धापनदिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्...


माजलगाव/प्रतिनिधी

           तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचा वर्धापनदिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महिलांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराला रविवारी प्रारंभ झाला. दुपारपर्यंत गरजू महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून तपासणीचा लाभ घेतला. दरम्यान, या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून शेकडो महिलांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

या महाआरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके होत्या तर शिबिराचे उद्गाटन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिवकन्याताई शिवाजीराव सिरसाट यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये तुळजाभवानी अर्बनच्या अध्यक्षा सौ.दिपालीताई चंद्रकांत शेजुळ, पंचायत समिती सभापती सौ.सोनालीताई भागवतराव खुळे, जि.प.सदस्या सौ.अनुसया साळुंके, सौ.भारती सावंत, सौ.भारतीताई तिडके, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, जि.प.सदस्या, नगरसेविका आदींची होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शेजुळ, सुमित शेंडगे, भास्कर गवळी आदींनी परिश्रम घेतले. या महाआरोग्य शिबिरात 

या मोफत शिबिरात बार्शी येथील कॅन्सरतज्ज्ञ डाॅ.नंदकुमार पानसे, डाॅ.प्रतिभा मुळे, डाॅ.विजया दुलांगे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंजली मुंडे, वंधत्व तज्ज्ञ नंदकुमार मोरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.अर्चना मोरे, डाॅ.अंजली अकोलकर, डाॅ.प्रिती रूद्रवार आदी तज्ज्ञ डाॅक्टरांनी गरजू लाभार्थी महिलांची करून योग्य मार्गदर्शन आणि उपचार केले. तसेच मोफत औषधी देण्यात आली. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळवल्याबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel