धर्माबाद: (अहमद लड्डा) तंझीम-ऐ-इंसाफ ची धर्माबाद कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष पदी सय्यद अल्ताफ, शहर अध्यक्ष म्हणून पत्रकार म.मुबशिर तर सचिव पदी नाविद अहेमद यांची नांदेड चे जिल्हा अध्यक्ष अ. बशीर माजिद यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते निवड करण्यात आली आहे..
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड चे मोईन कुरेशी, नांदेड शहर अध्यक्ष जुबेर खान,जिल्हा उपाध्यक्ष अझरोद्दीन आदींच्या उपस्तिथीत धर्माबाद ची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली उपाध्यक्षपदी सय्यद आरिफ,अब्दुल रशीद,तर संघटक पदी माजी नगर सेवक समीर अहेमद व सह सचिव डॉ. मसूद खान, रहीम खान, सय्यद बाबर, कोषाध्यक्ष म्हूणून अब्दुल उस्मान ,तालुका मीडिया प्रसिद्धी प्रमुख अब्दुल रजाक सर सदस्य शेख इम्रान, अब्दुल कुददुस, शेख अझीज,आदींची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष अ. बशीर यांनी अल्पसंख्याकांचे हक्क व त्यांना मिळणारे फायदे या बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले तसेच तंझीम-ऐ-इंसाफ ही संघटना मानवी हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना असून या उद्देशाने संघटनाद्वारे अनेक सामाजिक उपक्रम जनहितार्थ राबिवले आहे असे यावेळी सांगितले कार्यक्रमाचे सूत्र संचालन म.मुबशिर यांनी केले तर आभार समीर अहेमद यांनी मांडले.

COMMENTS