माजलगाव प्रतिनिधी
तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी रामेश्वर चव्हाण, हनुमान चव्हाण यांच्या शेतात विद्युत तारेचे घर्षण होऊन त्यांच्या असलेला दोन हेक्टर ऊस जळून खाक झाला असल्याने विद्युत वितरण कंपनी नुकसानीस जबाबदार असून विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे जळालेला ऊस कारखाने घेऊन जावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कारखान्याकडे चकरा मारून देखील कारखानदार शेतकऱ्याच्या ऊसाला तोड द्यायला तयार नाहीत याउलट दोन दिवस थांबा, तीन दिवस थांबा अशी आश्वासने शेतकऱ्याला देऊन त्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम कारखानदार करत आहेत याशिवाय चालू बिला पेक्षा तीस टक्के रक्कम कपात करूनच तुमच्या उसाचे बिल मिळेल अशा अटीवर सहकारी साखर कारखाना ऊस गाळपास घेऊन जात आहे जळीत उसाच्या बिलात 30 टक्के कपात करून शेतकऱ्यांची लूट कारखानदार करत आहेत हे तात्काळ थांबवले नाही तर येत्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कारखानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा शेकापचे नेते भाई अॅड. नारायण गोले पाटील
यांनी दिला आहे

COMMENTS