केज प्रतिनिधी :- केज येथे नगर पंचायतीने नागरिकांत परिसर स्वछता, वैक्तिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यावर नागरिकांत जनजागृती करण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
केज येथे नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्या उपस्थितीत केज येथील चौका-चौकात व सार्वजनिक ठिकाणी औरंगाबाद येथील पथनाट्य सादर करणाऱ्या कलापथकाने नागरिकांनी शौचालयाचा वापर करणे, परिसर स्वच्छता, ओला व सुका कचरा वेगवेगळा करून सार्वजनिक कचरा कुंडीचा वापर करून घंटागाडीत टाकणे, तसेच गाव आणि परिसर हागणदारी मुक्त करण्यासाठी वैक्तिक व सार्वजनिक शौचायचा वापर करणे, व्यसनमुक्ती आणि प्लस्टिक बंदी गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन आणि विक्रीबंदी. या बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांचे मनोरंजनातून संदेश देणारे नाट्यकरण व उपहासात्मक आणि विनोदी शैलीतून कलाकारांनी सादरीकरण केले. यावेळी उपस्थित असणारे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी या कलापथकाचे कौतुक केले.

COMMENTS