जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलिस ठाणे सर्वात मोठे ठाणे असुन या ठाण्याच्या हद्दीत 83 गावांचा समावेश आहे. मात्र ठाण्याचा कारभार अकार्यक्षम ठाणेदाराकडे दिल्या गेल्यामुळे ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्या बरोबर चोरीचे सत्र सुरूच आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा चोरीची मोठी घटना घडली असून ज्याचा अद्याप तपास न लागल्याने नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात कार्यरत तत्कालीन पोलिस निरिक्षक व्यंकटराव केंद्रे यांच्या दोन वर्षच्या कार्यकाळात ठाण्याचा कारभार सुरळीत सुरू होता. केंद्रे यांनी अवैध धंद्यावर कारवाई चा बडगा उगारून अवैध धंदेचालकांना सळो की पळो करून सोडले होते. ठाणेदार म्हणुन त्यांची वेगळीच क्रेज निर्माण होती.
केंद्रे यांनी आखाडा बाळापुर शहरातील विविध परिसरात सिसिटिव्ही कँमेरे बसवीले होते. ठाण्यात बसुन शहरातील घटने वर तात्काळ कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. मात्र केंद्रे यांची बदली झाल्यानंतर सदर सिसिटिव्ही बंद पडले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक हूंडेकर यांनी ठाण्याचा पदभार घेताच ठाणे अंतर्गत अवैध धंदे बोकाळले असुन चोरटे सक्रीय झाले आहेत. आठ दिवसात दुसरी मोठी चोरीची घटना घडली असुन वारंगा फाटा येथे मागील आठवडा भरापुर्वी एकाच रात्री पाच दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्याचा तपास लागण्यापूर्वी पुन्हा 21 डिसेंबर ला बाळापुर शहरातील मुख्य बाजारपेठेतील आठ दुकाने फोडून 57 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. भर बाजार पेठेत चोरीचे घटना घडत असुन चोरटे पोलिसांना खुलेआम आवाहन देत आहेत. आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात एखाद्या कर्तबगार ठाणेदाराची नियुक्ती करून सध्या कार्यरत असलेले अकार्यक्षम ठाणेदार यांची बदली करण्याच्या मागणीचा सुर उमटत आहे.
याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती आखाडा बाळापुर पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे,आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर, म यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील आठवड्यात नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हिंगोलीतील काही ठाण्याची वार्षीक तपासणी करणार असुन आखाडा बाळापुर च्या ठाणेदारावर काय कारवाई करणार याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.


COMMENTS