केज/प्रतिनिधी,
श्रीकांत जाधव. केज तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले नांदुर घाट नांदुर घाट येथे आठवडी बाजार मंगळवारी भरतो त्यामध्ये काही वर्षांपूर्वी नांदूर घाट येथील बाजार तळावर भाजीपाल्याचा भरणारा बाजार पूर्व ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला होता. त्यानंतर काही वर्ष हा बाजार येथेच भरत आला आहे .खासकरून पूर्णत्व जागेवर बाजार भरण्याचे कारण गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे .की आत्ता ज्या ठिकाणी भाजीपाल्याचा बाजार भरतो आहे तेथे दारू दुकान व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात त्यामुळे तिथे महिलांना त्रास होतो. भाजीपाल्यासाठी खरेदीला गेलेल्या महिलांना या व्यसनी लोकांपासून त्रास होतो त्यामुळे बऱ्याच काळापासून ही मागणी होत होती की नांदुर घाट चा पूर्व नियोजित बाजार मारुती मंदिराशेजारी भरण्यात यावा परंतु आज गावातील व्यापारी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत नांदूर घाट येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी सरपंच पांडुरंग चांगण यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्यात येईल असादेखील आशावाद सरपंचाकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामपंचायत नांदूर घाट णे गावकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे महिलांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी बाजार पूर्वनियोजित भरण्यात यावा अशी निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी मागणी केली आहे या निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या नावासहित स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS