हिंगोली:महेंद्र गिरी
कसबे धावंडा येथील अपघाती निधन झालेले शिवसैनिक सचिन मिराशे यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांत्वनपर भेट देऊन खासदार हेमंत पाटील यांनी मानसिक आधार देत सामाजिक बांधिलकी जपली.आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून शासनाची सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.सोबतच मतदार संघात अनेक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा शिवसैनिक सेना हिंगोली जिल्हाउपाध्यक्ष सचिन मिराशे यांचे नुकतेच विहिरीत ट्रॅक्टर पडून दुर्दैवी निधन झाले.त्यांचे कार्य आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते सर्व परिचित होते.ऐन कार्यकृतृत्वाच्या दिवसात त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे संपूर्ण जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात आली.खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा यावेळी दिल्लीस्थित असताना शोक व्यक्त केला होता. ऐन सणासुदीच्या दिवसात मिराशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघात परत आल्यावर यंदाची दिवाळी मिराशे कुटुंबासोबत साजरी करण्याचे ठरवून आज (दि.१४ ) त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत केली आणि शासनाची सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.सचिन मिराशे हे कट्टर शिवसैनिक होते त्यानी आजवर शिवसेनेशी प्रामाणिक राहून अनेक आंदोलनात आणि एकूणच सर्वच कार्यात हरीरीने सहभाग घेतला असून एवढ्या कमी वयात त्यांचे असे अचानक अपघाती जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी घोडाकामठा, येथील स्वातंत्र सेनानी वत्सलाबाई देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.तसेच येलकी ,येहळेगाव(तुकाराम) या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यासमवेत डॉ.सोमेश्वर पतंगे. डॉ. दत्तात्रय काळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे, कळमनुरी प.स.उपसभापती,अजय उर्फ गोपु पाटील,कृष्णा पाटील-भिसे, सोपान पाटील, बोंढारे, विजयराव पाटील बोंढारे,मुन्ना भाऊ देशमुख बाजर समिती सदस्य,भरत देसाई, पिंटू भाऊ देशमुख उगले यांच्यासह आदी उपस्थित होते.
COMMENTS