===================================
केज/प्रतिनीधी
केज तालुक्यातील हादगाव परिसरात मागील झालेल्या परतीच्या पावसाने बहुतांशी शेतकऱ्यांचे शिवारातील सोयाबीन पाण्यात गेले आहे. तरी नुकसान झालेल्या सोयाबीनचे व इतर पिकांचे प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी हादगाव चे सरपंच सुनील वायबसे यांनी केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि यावर्षी खरीपाची पिके पाऊसकाळ चांगला राहील्यामुळे जोमात आले आहेत. परंतु सोयाबीन, बाजरी हे पिके काढणीला आले असतानाच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला. व त्यामुळे केज तालुक्यातील सोयाबीन आणि बाजरी सारख्या पिकांची काढण्याची कामे थांबली असून शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दाणे उगऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी परिस्थिती झाली आहे. दर वर्षी आसमानी संकट असो वर सुलतानी संकट असो शेतकर्यांच्या पाचवीला पुंजले आहे.
दरम्यान कृषी विभागाला वारंवार तक्रार देऊनही कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले, असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हादगाव शिवारातील सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हादगाव येथील शेतकरी अनिल रामराव वायबसे व मनीषा लालासाहेब वायबसे यांनी मेहनत आणि खर्च करून चांगल्याप्रकारे सोयाबीनचे पीक आणले होते.परंतु मागील झालेल्या परतीच्या पावसाने पूर्ण शेतात पाणी साचून हदगाव शिवारातील गट नं -69 मधील पंचवीस एकरातील सोयाबीन पाण्यात गेले आहे.त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळुन जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न हातातून गेले आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. जर शासनाने त्वरित पंचनामे नाही केले तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा हादगाव चे सरपंच सुनील वायबसे यांनी दिला आहे
.
COMMENTS