*
*केज प्रतिनिधी*
छावा मराठा संघटनेचे तहसीदाराना निवेदन
केज:- तालुक्यातील उंदरी ते केज पिसेगाव मार्गे रस्ता दुरुस्ती ची मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हा प्रमुख यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.सध्या एकीकडे महामार्ग रस्त्याचे काम जोरात सुरू असताना इकडे मात्र ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी झाली आहे. उंदरी ते केज पिसेगाव मार्गे रस्ता हा अंत्यत जीवघेणा झाला आहे रस्त्यात खड्डेच खड्डे झालेले आहेत त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण तर वाढतेच आहे पण सततच्या आदळ अपटीने मणक्याचे आजार निर्माण होते आहेत.व आशा रस्त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झालेली आहे याकडे सर्व लोकप्रतिनिधी, व बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष आहे म्हणून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालनू रस्ता दुरुस्त करण्याची मागणी छावा मराठा संघणेकडून करणयात अली आहे.निवेदनावर छावा चे जिल्हाप्रमुख शिवाजीराव ठोंबरे ,प्रवीण खोडसे,हमीद, शेख,रंजित घाडगे,प्रशांत नवगिरे,राहुल ननावरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
COMMENTS