माजलगाव/प्रतिनिधी
सतत च्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना गावातील तलाठी यांना दिल्या आहेत तालुक्यातील सोन्नाथडी व शुक्लतीर्थ लिमगाव येथे पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत
या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली असून पूर्ण पावसाळा हा ओला गेला आहे सतत जोरदार पाऊस झाल्याने या वर्षी खरिपाच्या हंगामातील सोयाबीन ,मूग ,बाजरी ,उडीद सह उसाच मोठ नुकसान झालं आहे काढणीस आलेले सोयाबीन ,मूग व बाजरीचे खुप नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानची मदत मिळावी या उद्देशाने शासनाने तहसील मार्फत तलाठ्यांना आदेश काडून पंचनामे करण्यास सांगितले आहेत तालुक्यातील कर्तव्य दक्ष तलाठी म्हणून ओळख निर्माण करणारे श्री अभारे यांनी त्यांच्या सोन्नाथडी व शु लिमगाव येथे प्रेत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंच नामे करणे मागच्या चार पाच दिवसा पासून केले आहे त्यांच्या समवेत ग्रामसेवक करे व उदावंत,कृषी सहाय्यक पवार व भडके ,सरपंच किसन वगरे या पंचनामा समितीचा सहभाग आहे
शेतकऱ्यांनी आपले शेतातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आव्हान ही तलाठी अभारे यांनी केले आहे
COMMENTS