नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील रहिवासी व यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कलाशिक्षक महादेव खळुरे हे यांचे आकाशवाणी नांदेड केंद्रावर आज बुधवार ता. ७ रोजी रात्री साडे नऊ वाजता कला या विषयावर मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आपला शिक्षकी पेक्षा सांभात राष्ट्रीय व सामाजिक कार्यात आपल्या कार्याची वेगळी छाप सोडत कला या विषयात मराठवाड्यात आपल्या कलेचा झेंडा रोवला.तसेच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य सांधत अनेक तंबाखू व सिगारेटच्या जीवघेण्या जडलेल्या व्यसनातून अनेक पालकांना व तरूणांना व्यसनातून बाहेर काढले. तर कलेच्या ग्रामीण भागात कसल्याच प्रकारच्या सुविधा नसतानाही कला या विषयात दैदिप्यमान यश संपादन करत अनेक विद्यार्थी घडवित असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल आकाशवाणी नांदेड ने घेतली.
प्रसारण अधिकारी राहुल अञाम हे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी मुलाखत आपल्या मुक्तसंवाद या कार्यक्रमातून घेतली आहे. मुक्रमाबाद सारख्या ग्रामीण भागातून आकाशवाणीवर मुलाखत घेतले जाणारे महादेव खळुरे हे पहीलेच शिक्षक ठरल्यामुळे त्यांचा सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
COMMENTS