माजलगाव/भास्कर गिरी
बहुजन समाजाचे नेते आणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.गोपिचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे धनगर समाजाचे नेते तथा माजी सरपंच नारायण भले यांनी पालावरील ६१ कुटुंबाना प्रत्येकी १० किलो गहु,तांदळाचे व मास्कचे वाटप गुरुवार दि ०१ आँक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते तथा विधान परिषदेचे आ.गोपिचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे सकाळी १०:०० वाजता धनगर समाजाचे नेते तथा माजी सरपंच नारायण भले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराजवळील भिक्षा मागुन जिवन जगणाऱ्या पालावरील ४५ गिरी गोसावी व १६ नाथ गोसावी अशा ६१ कुटुंबाना प्रती कुटुंब १० किलो गह व तांदळाचे आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी अविनाश कांडुरे,सरपंच कल्याण कसपटे, सरपंच किसन वगरे, संतोष देवकते,गजानन देवकते,तात्या पंचाळ, अर्जुन गोरे, ज्ञानेश्वर सरवदे यांची उपस्थिती होती.
COMMENTS