माहूर( प्रतिनिधी) मराठा सेवा संघाच्या बत्तीस कक्षा पैकी महत्वपूर्ण बुद्धि प्रामाण्यवादी कक्ष म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या तानुबाइ बिर्जे पत्रकार परिषदेच्या माहूर तालुका अध्यक्ष पदावर पत्रकार संजय सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील महाजन यांचे मार्गदर्शनात पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास दादा पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी सोनटक्के यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता भाऊसाहेब नेटके, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे, विखे पाटील कृषी परिषदेचे महाविदर्भ संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सोपानराव क्षीरसागर, शिवाजीराव पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, पंडीतराव कदम, विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, विदर्भ संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी पाटील, जिल्हा प्रवक्ते भाऊसाहेब नेटके, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे पाटील, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विशाल शिंदे पाटील, सुधीर जाधव, प्रा.प्रवीण बिरादार, विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव,विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवशंकर थोटे आदिंनी संजय सोनटक्के यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS