नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
खतगाव सारख्या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील शिक्षकांचा मुलगा चि.ओमकार बालाजीराव पेटेकर हा नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत 720 पैकी 620 मार्क घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे. ओमकारला शिक्षणाबरोबरच चित्रकला,गायन, आणि बुद्धिबळ अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा त्याला अभिरुची आहे.तो बुध्दिबळ स्पर्धेत सलग तीन वेळेस जिल्ह्यातून प्रथम येत विभागीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत विविध पारितोषिक मिळवले.नायगाव येथील ब्लु बेल्स इंग्लिश स्कूलमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेत 97 टक्के मार्क घेऊन तो नायगाव तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळवला. सातत्य,जिद्द्,चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर आहे.ओमकार हा प्रसिद्ध साहित्यिक,कवी,कथाकार,चित्रकार बालाजी पेटेकर यांचा तो मुलगा आहे.अशा गुणी होतकरू व चिकाटीने अभ्यास करणारा ओमकार हा आजच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे.आपल्या यशाचे श्रेय तो आपले आई वडिल व गुरुजनांना देतो.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खा.भास्करराव पा.खतगावकर,जेष्ठ साहित्यिक मधुकरराव पा. खतगावकर,बाळासाहेब पा.खतगावकर,जि.प.सदस्या मिनलताई पा.खतगावकर, ओबीसी.प्रदेश उपाध्यक्ष मा.माणिकराव लोहगावे,युवानेते रवि पा.खतगावकर,व राजकीय,सामाजिक,साहित्यिक,क्षेत्रातील मान्यवरांनी,पत्रकार बंधू,मित्र परिवार व हितचिंतकांकडुन अभिनंदन होत आहे.
COMMENTS