हदगाव तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये हदगाव येथिल नामांकीत असलेले व्यापारी प्रविण वल्लमशेटवार (कवानकर) यांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, आणि दोन मुलीसह, सामुहीक आत्महत्या केलेल्या घेटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला असता, अशा सामुहीक आत्महत्या केलेल्या सहस्त्रकुंड धबधबा स्थळाला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाची ०२ सप्टेबर २०२० रोजी एक वाजताच्या सुमारास पहाणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी प्रत्यक्ष पहाणी केल्याने या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून घटनास्थळी सामुहीक आत्महत्या करणाऱ्या कुटूंबातील पाचही सदस्यांचे चपल बुटांचे जोड हे घटना स्थळी अढळून आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून ऐकावयास मिळाल्याने या पाचही लोकांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज लावला जात आहे.
तिन मृतदेह आतापर्यंत किनवट तालुक्यातील इस्लापूर व उमरखेड तालुक्यातील बिटरगाव व दराटी पोलीसांच्या हाती लागले आहे पण त्या दोन मुलींचे मृतदेह पोलीसांच्या हाती न लागल्याने ते मृतदेह कुठे असतील याचा शोध घेण्यासाठी नंदीकाठच्या गावातील लोकांकडे पोलीस संपर्क साधताना दिसुन येत आहेत,
एकाच कुटुंबातील सामुहीक आत्महत्या केलेल्या घेटनेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले, अशा सहस्त्रकुंड स्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,यांनी पहाणी केल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पहाणी दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकानी या प्रकणाची कसून चौकशी करण्याच्या सुचना इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे यांना दिल्या या प्रसंगी किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे, यावेळी उपस्थित होते. अशोक गायकवाड हदगाव
COMMENTS