*मराठा समाजाचे आरक्षण कायम टिकण्यासाठी व धनगर समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी सरकारकडे माजी आ.भीमराव धोंडे मागणी*
*********************
भीमराव धोंडे निवेदन देतानाचा फोटो.
*********************
आष्टी (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे हित लक्षात घेता कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते परंतु याबाबत मा.न्यायालयात याचिका दाखल झाल्या कारणाने मा.न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात खंडपीठाकडे वर्ग करत असताना आरक्षणात दिलेली अंतरिम स्थगिती निर्णय हा दुर्दैवी असा आहे.त्यामुळे सबंध मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत.मराठा समाजाचे आरक्षण कायम राहण्यासाठी शासनाने तात्काळ पाऊले उचलावीत असे निवेदन भाजप नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टीचे तहसीलदार यांना दिले आहे.आरक्षणास पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांपैकी सर्वात आगोदर भीमराव धोंडे यांंचाच पाठींबा असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये माजी आ.धोंडे यांनी असे म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाने तात्काळ दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.राज्य सरकारने ११ सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यासाठी त्वरित पाऊले उचलावीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठविण्यासाठी पाठपुरावा करावा.शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात आरक्षणामुळे मिळालेली सवलत सुरू ठेवावी.मराठा समाजाचे आरक्षण कायम होईपर्यंत राज्य सरकारने पोलीस भरती सह इतर सर्व नोकर भरती थांबवावी.आजपर्यंत झालेल्या सर्व जाहिराती आधार धरून सर्व मराठा समाजातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेऊन नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी अशा अनेक मागण्या त्यांनी निवेदनातुन केल्या आहेत.राज्य शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार करून त्यांच्या आरक्षणाच्या संबंधातील अध्यादेश काढण्यात यावा.एकुण १० मागण्या माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टीचे नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांच्यामार्फत शासनाकडे केल्या आहेत.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,शंकर देशमुख ,संभाजी जगताप, तात्यासाहेब कदम, झुंबर चव्हाण,संभाजी झांबरे ,महादेव कोंडे ,लक्ष्मण उकले,शिवाजी थोरवे,दिलीप काळे,अण्णासाहेब लांबडे आदी उपस्थित होते.
COMMENTS