केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील डिघोळ आंबा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आत्मा व कृषी विभाग केजच्या वतीने दि 28व 29 सप्टेंबर या दोन दिवशी कौशल्य विषयक ट्रॅक्टर चालकाचे बी.बी.एफ.तंत्र या विषयाचे प्रशिक्षण दिघोळ आंबा येथे आयोजित केले होते.सदरील प्रशिक्षणाचे उदघाटन श्री.डी.जी.मुळे प्रकल्प संचालक आत्मा बीड यांचे हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणा मधे श्री.प्रमोद रेनापुरकर यानी बी.बी.एफ.यंत्र याची ओळख तसेच या यंत्रामधे पिकाच्या गरजेनुसार बियातील अंतर, खोली, ओळीतील अंतर टोकन पध्दतीने बियाणे पेरणी करणे चकतीची निवड चकती बसविने या पद्धती या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच श्रीराम गोरे व नागनाथ जाधव यानी रुंद सरी वंरबा या टोकन यंत्राच्या वापरात येणाऱ्या अडचणी त्यासाठी घ्यावयाची काळजी देखभाल व दुरुस्ती यंत्रासाठी लागणारे आवश्यक सुटे भाग मिळण्याचे ठिकाण या विषयी माहिती दिली.
श्री.दत्ता काकडे यानी स्वतःच्या शेतामधे वापरात असलेले बी.बी.एफ.यंत्र त्याचा फायदा उत्पादन व खर्च याविषयांवर अनुभव सांगितले.
या प्रशिक्षणा साठी केज तालुक्यातील विविध भागातील ट्रॅक्टर चालक सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रेणापूरकर यांनी तर आभार श्री योगेश पाटील बीटीएम आत्मा यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी श्री.बी.बी.शेळके ता.कृ.अ.केज, श्री.जगजिवन पी.डी, श्रीमती.घुले व्ही.आर, श्रीमती. कदम व्ही.व्ही.मंडळ कृषी अधिकारी, श्री आनंद मुंडे, श्री.साखरे एस.सी. व ट्रॅक्टर चालक उपस्थितीत होते.
COMMENTS