केज प्रतिनिधी.
केज :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे.याअगोदर अनेक जातींना आरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे आरक्षण प्रकरण सोपवलं अनेक केसेस प्रलंबित देखील आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटक मधील आरक्षण प्रलंबितच आहे परंतु स्थगिती कधीच मिळाली नाही मग फक्त मराठा आरक्षणावेळीच स्थगिती मिळाली. मराठा समाजातील कुटुंबाचे मागासलेपन सिद्ध होऊन ही मा. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळते मराठा क्रांती मोर्चाने व संघटनांनी वेळोवेळी सरकारला पाठपुरवठ्या बाबत सूचना करत होत्या परंतु त्याचा गांभीर्याने विचार झाला नाही ,याचा परिणाम समाजावर होणार आहे त्यामुळे सरकारने तात्काळ कायदा करून ,मराठा समाजाला कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता कायदा करून आरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री याना देण्यात आले यावेळी छावा मराठा संघटनेचे जिल्ह्याप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गिराम, गोकुळ मुळे,अशोक कराड यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
COMMENTS