-----------------------
एखाद्या समाजात क्रांती होते म्हणजे नेमके काय होते हे बरेचदा सांगता येत नाही...लोकांना दिसतो तो एकदम झालेला अनपेक्षित बदल.पण या बदलांचा अचानकपणा लोकांसाठी असतो. प्रत्यक्षात ज्या समाजात क्रांती होते त्या समाजाची मशागत कोणीतरी चिकाटीने,सातत्याने, प्रसिद्धीपासून दूर राहून केलेली असते.लोकांना ती दिसत नाही. त्यांना दिसते ते भरभरून आलेले पीक. पण असे मशागतीचे काम कंटाळवाणे असते, हे काम करणाऱ्यांची चिकाटी,निष्ठा, सारे काही पणाला लागलेली असते. समाजाचा सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक, विकासाचा गाडा उत्तरोत्तर प्रगती कडे जावा... फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेच्या परिवर्तनवादी चळवळीतील अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेली ही रास्त भावना आहे... माझ्या समाजाचा विकास व्हावा,शिकून उच्चपदावर गेलेली माणसं कुटुंबाचा,समाजाचा, राष्ट्राचा,विकास व्हावा या हेतूने प्रेरित व्हावेत...या उदात्त हेतूने गेल्या 35 वर्षांपासून डॉ दशरथ भांडे साहेब हे सातत्याने आदिवासी समाजासाठी कार्यरत आहेत... आज त्यांचा वाढदिवस ..त्यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...
त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न...भारतीय संविधान नुसार लोकशाहीत सर्वांना समान न्याय आहे... समाज व राष्ट्राच्या हितासाठी वंचित, बहुजनातील माणसे उच्च पदावर बसलेली आम्हाला हवी आहेत.. सामाजिक, आर्थिक न्याय व सुधारणा करण्याची प्रेरणा नेहमी आपल्या कार्यातून त्यांनी दिलेली आहे..अन्यायग्रस्त आदिवासी समाज हा मागास व दरिद्री राहिला कारण कित्येक शतके आपण मुके राहिलो आहोत..व्यक्त होण्यास वाट मिळाली नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात सामाजिक आर्थिक राजकीय समानता कृतिशील रित्या आचरणात आणली पाहिजे. प्रत्येकाच्या,अंतःकरणात स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे.. समाजाची प्रगती, लौकिकता, केवळ शिक्षणामुळे वाढते.भारतीय घटनेने जरी आरक्षण मिळवून दिले तरी योग्य ते शिक्षण घेऊनच उच्च पदावर आपण पोहोचू शकतो..प्रत्येक समाजाचे भवितव्य त्या समाजातील सुशिक्षित लोकांवर अवलंबून असते..
याची जाणीव आम्हा बहुजनांना,आदिवासी समाजाला,डॉ दशरथ भांडे साहेबामुळं झाली.समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी सदोदित अविरत, कसोशीने व प्रामाणिक भावनेने काम करणे हे जागृत नेत्यांचे काम आहे. .डॉ भांडे साहेब हे सातत्याने समाजाच्या अस्तित्वासाठी जागल्याची भूमिका पार पाडत आहेत.. एका छोट्या खेड्यातून जन्मलेल्या अन्यायग्रस्त वंचित,आदिवासी कुटुंबातील डॉ दशरथ भांडे या नावाला त्यांनी खूप मोठं वलय मिळवून दिलं आहे..गावचा ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच,जी प सदस्य ते जी प अध्यक्ष,आमदार ते कॅबिनेट मंत्री ....हा प्रवास निश्चितच सहज व सोपा नसेल ...खूपच संघर्ष असेल...आम्हा आदिवासी जमात बांधवांना अभिमानास्पद बाब आहे..आपल्या प्रेरणेतून निश्चित समाज बोध घेईल व अन्यायाला वाचा फोडण्यास तो तुमच्या नेतृत्वात सामील होईल...लोकप्रतिनिधी कसा असावा. ?याचा उत्तम वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.आपल्या आमदार व मंत्री पदाचा त्यांनी योग्य उपयोग केला ...मात्र सत्तेत बहुमताचा कदर होत असते..ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्य उजळतं.. पण त्याच ज्योतीला जर अहंकाराचा वारा लागला तर वणवा पेटतो..जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते... शेवटी माणसाचं जीवन हे धन्य कशाने होतं...?भरपूर पैसे कमावल्याने की, प्रसिद्धी प्राप्त केल्याने...? या दोन्हीतही जीवन साफल्याचे बीज नाही... प्रत्येकाने पैसा, प्रसिद्धी,स्टेटस, नाव, यांच्या मागे लागावं...पण हे करता करता पूर्ण जीवनाला व्यापून उरेल..असे एखादे स्वप्न उराशी बाळगावं...!त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपण निरंतर जागृत राहून आग्रही असावे..आपले हक्क व सवलती आपणास मूठभर लोकांच्या हाती सत्ता असल्यामुळे मिळत नाहीत... आपण तुडविले,लाथाडले,अव्हेरले,जात आहोत..याचे कारण आपणास आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा राग,चीड,येत नाही.. अन्यायाचा प्रतिकार आमच्या पूर्वजांनी केला नाही.. त्यांचे अज्ञान,दारिद्र्य,अशिक्षितपणा,चूक होती...
आता अपमान,अन्याय,जाच,कुरघोडी,सहन करण्याचे दिवस संपल्याची जाणीव समस्त मूळ अन्यायग्रस्त आदिवासी समाजाला केवळ
डॉ भांडे साहेबांमुळे झाली...
2000 साली विधानसभेत जातीचे प्रमाणपत्र देण्याचे विधेयक संमत करण्याआधी चर्चेसाठी ठराव आला त्यावेळी डॉ भांडेसाहेबानी तब्बल साडेतीन तास किल्ला लढवला...
विधेयकाच्या विरोधात मुद्देसूद भाषण देऊन त्यांनी अन्यायग्रस्त आदिवासी जमातीवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला...ठरावाला प्रखर विरोध केला..मा राष्ट्रपती कडे देखील त्यांनी विनंती केली... शेकडो वर्षापासून अनुसूचित जाती/जमाती ह्या सामाजिक,आर्थिक,मानसिक, सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,पिळवणुकीत पिचत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या मागासलेल्या जाती जमातींना सामाजिक प्रवाहातआणून, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,चांगले जीवन जगता यावे म्हणून चांगल्या व उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली...भारतीय संविधान अनुसूचित जाती व जमाती कायदा 1950 व सुधारणा कायदा 1956नुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली..
मात्र 1956 पासून अनुसूचित जमातीवर क्षेत्रबंधन लादून विस्तारित क्षेत्राबाहेर राहणारे आदिवासी जमातींना सोयीसुविधा, सवलतीपासून वंचित करण्यात आले...
1956 च्या आदेशानुसार ठरवलेल्या क्षेत्राबाहेरील आदिवासी समाज हा अडाणी व मागासच राहिला... पिढ्यानपिढ्या असलेली गरीबी, अज्ञान,दारिद्र्य,निरक्षरता, लाजरे बुजरेपणा,संघटन व संघर्षाचाअभाव,दूरदृष्टी व मुत्सद्दीपणाचा अभाव, यामुळे आरक्षण असून राजकीय षडयंत्रामुळे मिळवू दिले गेले नाही.. परिणामी हा समाज वरचेवर मागास राहिला...
1956 ते 1976 पर्यंत हा आदेश लागू होता व कार्यान्वित होता... मात्र स्वातंत्र्यानंतर वीस वर्षांनी सुद्धा शासकीय दरबारी ही कैफियत,दुर्दशा,अन्यायाला वाचा फोडण्याची जाण,भान,प्रबोधन,समाजाला आली नाही त्यामुळे समाज पुन्हा मागे गेला...
कालांतराने केंद्रशासनाच्या नजरेला सदर बाब आली त्यामुळे 1976 सुधारित कायदा पास करुन देशातील कोणत्याही भागात वास्तव्य करणारा,विस्तारित क्षेत्राबाहेरील आदिवासी समाज बांधव सवलतींना पात्र ठरवण्यात आला... त्यानुसार राज्यातील सर्व आदिवासी जमातींना आरक्षणाचे लाभ मिळू लागले..त्यामुळे संख्या वाढली...आरक्षणाचे हक्कदार, वाटेकरी वाढले...क्षेत्रबंधन उठवण्यापूर्वी सगळे लाभ ठराविक जिल्ह्यातीलच आदिवासी जमातींना मिळत होता...लोकसभा,विधानसभा मतदारसंघ राखीव,इतर सर्व अनुदान,योजना अनुदान इतर अनेक सोयी सुविधा ह्या हे पूर्ण राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्राकडून येत होते...मात्र पाच ते सहा जिल्ह्यातच हा संपूर्ण निधी खर्च केला जायचा...
आरक्षणाचा लाभ सगळ्यांना मिळू लागला म्हणून त्यांना अटकाव करण्याचे ,रोखण्याचे कुटिल कारस्थान जमातीच्या नेत्याकडून,लोकप्रतिनिधींकडून,शासन यंत्रणेतील काही अधिकारी वर्ग,यांनी रचवले...विस्तारित भागातील 33 जमातींना जातचोर, बोगस ,खोटे,नामसदृश्याचा फायदा घेणारे, म्हणून बदनामी करून आरक्षणाच्या सोयीसवलती नाकारण्यात आल्या....
मात्र या वादळात अन्यायग्रस्त आदिवासी समाजाची नौका डॉ.दशरथ भांडे साहेब यशस्वीरीत्या सांभाळत आहेत... त्यांना अन्यायग्रस्त आदिवासी जमातींच्या संपूर्ण प्रश्नांची जाण आहे..विविध पातळीवर त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे.. चहूबाजूने अंधःकारमय झालेल्या 33 जमातींना योग्य दिशेने शासन दरबारी आपली कैफियत मांडत आहेत...
आजपर्यंत साहेबांनी अनेक सामाजिक प्रश्नाची उकल केलेली आहे...
क्षेत्र बंधना बाहेर विस्तारित क्षेत्रातील नवीन माडा व मिनी माडा पॉकेट निर्मितीस त्यांनी मान्यता मिळवून दिली.. त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी महादेव,मनेरवारलू जमातीसह सर्वच विस्तारित क्षेत्रातील आदिवासी जमातींना त्यांचा फायदा झाला...
डॉ.भांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने केंद्राला या प्रस्तावाची शिफारस केली... ठक्कर बाप्पा योजना महाराष्ट्र शासनाने 2003 ला लागू केली... संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासीबहुल गावांचा समावेश या योजनेत डॉ भांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे केला गेला... वाडी-वस्ती,पाड्यांना हजारो कोटी रुपयांचा निधी राज्यभर उपलब्ध झाला...
2010च्या पेसा कायदा मधील काही महत्वाच्या तरतुदी सुद्धा डॉ भांडे साहेबांनी सुचविल्या आहेत.. गेल्या पस्तीस वर्षात डॉ. भांडे साहेबांची अन्याग्रस्त आदिवासी समाजासाला न्याय मिळवून देण्यासाठी एकाकी लढण्याची जिद्द व संघर्ष संघर्षशीलवृत्ती आम्हा तरुणांना निश्चितच प्रेरणादायी आहे... त्यांच्या नेतृत्वाखाली 33 जमातींनी एकत्र यावे ...
भारतीय संविधानाने दिलेले आमचे अनुसूचित जमातींचे हक्क,आरक्षण यांचे रक्षण व संवर्धन मा डॉ दशरथ भांडे साहेबांनी करावे...त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हा आदिवासी जमातीला न्याय मिळावा अशी मनोकामना व्यक्त करून डॉ भांडे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो ही निर्मिकाकडे प्रार्थना करतो...
दत्तात्रय अन्नमवाड
नांदेड
मो 9860183370
COMMENTS