व*
नायगांव ( प्रतिनिधी )
नांदेड बिदर रेल्वे लाईनचे अंतिम सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाला असून आता प्रत्यक्ष कामाला सूरुवात होण्याच्या टप्प्यावर हा प्रकल्प येऊन पोहचला आहे. या रेल्वे मार्गामुळे नायगाव तालुक्यातील जणतेसाठी वाहतूकीचा एक मोठा पर्याय उपलब्ध होणार असून जणतेसाठी हा प्रकल्प अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी अनेकांची राजकीय धडपड चालू असली तरी या प्रकल्पाचे खरे शिल्पकार आदरणीय माजी खासदार भास्कराव पाटील खतगावकरच आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव ममता बॅनर्जी रेल्वे मंत्र्यांशी या प्रकल्पाचा संबंधित सततचा पाठपुरावा करून भास्करराव पाटील खतगावकर यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती त्यानंतर आपल्या खासदारकीच्या शेवटच्या दहा वर्षातील कार्यकाळात या प्रकल्पाच्या मोठा पाठपुरावा केला होता. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण व मुद्देसूद पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वेग मिळाला आणि आता यासंदर्भात प्रतेक्ष प्रकल्प उभारणीचा योग आला आहे.
त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी या संदर्भातील त्यांचा पाठपुरावा जाहीर करावा, असे अवाहन गोविंद जाधव मांजरमकर यांनी केला आहे.
COMMENTS