केज प्रतिनिधी.
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केज तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
सोयाबीन पेरणीनंतर बियाणे बऱ्याच प्रमाणात बियाणे उगवलेच नाही त्यामुळे दुबार पेरणी झाली. यावर्षी पाऊस जेमतेम पडत गेल्याने सर्व पिके जोमात आली मात्र मागच्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने जोर धरला आणि सोयाबीन सह मका,ऊस,तूर,मुग उडीद पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून निघणारे सोयाबीन देखिल निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भाव देखील मिळणार नाही त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास सोयाबीन ऊस हे पीक नुकसाणीमुळे शेतकऱ्यात चिंता निर्माण झाली आहे.पावसाने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाऱ्यामुळे ऊस पूर्णपणे भुईसपाट होऊन गेला. ऊसाच्या मशागतीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे व त्याचबरोबर जनावरांसाठी असणारी मका देखील उसाबरोबर जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे अशा पाण्यात गेलेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने दिलेल्या निवेदनात तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी म्हटले आहे यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, विष्णु थोरात, शशिकांत इंगळे,संदीप शितोळे, हर्षवर्धन खोडसे,श्रीमंत इंगळे,मनोज
स्वाक्षरी आहेत.
COMMENTS