नांदेड जिल्ह्याला करोनाचा जबरदस्त धक्का तब्बल १५४ बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 


 


नांदेड :(ग्लोबल टीम) 


गेल्या २४ तासात नांदेड जिल्ह्याला करोनाने जबरदस्त धक्का दिला असून तब्बल १५४ बाधितांची भर त्यात पडली तर तिघांचा मृत्यू. समाधानाची बाब म्हणजे ४१ व्यक्ती बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल ३१ जुलै रोजीच्या अहवालानुसार एकूण ७४६ अहवालापैकी ४७१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ८३९ एवढी झाली असून यातील ८८७ एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे.


 


बुधवारी २९ जुलै रोजी हिंगोली गेट नांदेड येथील ६७ वर्षाचा एक पुरुष, गुरुवार ३० जुलै रोजी मिलगेट नांदेड येथील ७० वर्षाचा एक पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील ६९ वर्षाच्या एक महिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ८१ एवढी झाली आहे.


 


काल बरे झालेल्या ४१ बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील ६, देगलूर कोविड केअर सेंटर येथील ३, लोहा कोविड केअर सेंटर येथील ३,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १३, कंधार कोविड केअर सेंटर येथील ४, खाजगी रुग्णायातील ४, मुखेड कोविड केअर सेंटर येथील ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील २, बिलोली कोविड केअर सेंटर येथील १ अशा ४१ कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.


 


आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये देगाव चाळ नांदेड येथील ५५ वर्षाचा एक पुरुष, सराफानगर नांदेड येथील ४२ वर्षाचा एक पुरुष, तरोडा नांदेड येथील ७२ वर्षाचा एक पुरुष, शारदानगर नांदेड येथील ३८ वर्षाचा एक पुरुष व १९ वर्षाची १ महिला, वसंतनगर नांदेड येथील ३७,७१ वर्षाचा दोन पुरुष, वजिराबाद नांदेड येथील ४० वर्षाची १ महिला, लेबर कॉलनी नांदेड येथील ५० वर्षाचा एक पुरुष, निर्मलनगर नांदेड येथील ४५ वर्षाचा एक पुरुष, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धनघाट नांदेड येथील २५ वर्षाचा एक पुरुष व २९ वर्षाची १ महिला, कलामंदिर नांदेड येथील ४१ वर्षाचा एक पुरुष, नवीन मोंढा येथील ७२ वर्षाचा एक पुरुष, यशनगर नांदेड येथील ४८ वर्षाचा एक पुरुष, श्रीरामनगर नांदेड येथील ६६ वर्षाचा एक पुरुष, सुंदरनगर नांदेड येथील ६५ वर्षाची १ महिला, काबरानगर नांदेड येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, रामननगर सिडको येथील ८,३२ वर्षाचे दोन पुरुष व २९ वर्षाची एक महिला, व्यंकटेश्वरानगर नांदेड येथील ४५ वर्षाचा एक पुरुष, व्यंकटेशनगर नांदेड येथील ५८ वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर नांदेड येथील ७० वर्षाचा एक पुरुष, भाग्यनगर नांदेड येथील १९ वर्षाचा एक पुरुष व ३५, ४०,७५ वर्षाच्या तीन महिला, नांदेड हैदरबाग येथील २८, ३२ वर्षाचे दोन पुरुष व १६ वर्षाची एक महिला, मिलरोड येथील ३० वर्षाचा एक पुरुष, कौठा नांदेड येथील १९,३३,३९ वर्षाचे तीन पुरुष तर ९, ३०,५४ वर्षाच्या तीन महिला, सिडको येथील ४९ वर्षाचा एक पुरुष, पोर्णिमानगर येथील ३७ वर्षाचा एक पुरुष, एमजीएम कॉलेज येथील ३० वर्षाचा एक पुरुष, आंबेडकरनगर येथील ५५ वर्षाचा एक पुरुष, चौफाळा येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, जीएमसी परिसर विष्णुपुरी येथील २५ वर्षाचा एक पुरुष व २७ वर्षाची एक महिला, मिलगेट येथील ४७ वर्षाची १ महिला, मालेगाव रोड येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, विष्णुपुरी येथील २५, २६ वर्षाच्या दोन महिला, नेहरुनगर तरोडा येथील ६९ वर्षाची एक महिला, केळीमार्केट इतवारा येथील ६२ वर्षाची एक महिला, कृष्णानगर येथील ३० वर्षाचा एक पुरुष, साठेनगर येथील ३४ वर्षाची एक महिला, दत्तनगर येथील १८ वर्षाचा एक पुरुष, दुलेशानगर येथील २६ वर्षाचा एक पुरुष, दिपनगर येथील ५५ वर्षाची एक महिला, गुरुनगर येथील ४१ वर्षाचा एक पुरुष, मगनपुरा येथील ५२ वर्षाचा एक पुरुष, गोविंद कॉम्पलेक्स येथील ६६ वर्षाचा एक पुरुष, आखाडा बाळापूर येथील ७० वर्षाचा एक पुरुष, संघमित्रा कॉलनी ५१ वर्षाचा एक पुरुष, येताळा धर्माबाद येथील ३७ वर्षाची एक महिला, अर्धापूर येथील २९, २१,५० वर्षाचे तीन पुरुष व १९ वर्षाची एक महिला, बिलोली येथील ५३, ४० वर्षाचे दोन पुरुष, नायगाव रोड देगलूर येथील ६५ वर्षाची एक महिला व ५६ वर्षाचा एक पुरुष, मरखेल येथील ६० वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील ३४ वर्षाचा एक पुरुष, तोटावार गल्ली येथील ४५, ५० वर्षाच्या दोन महिला, सुगाव देगलूर येथील ४८ वर्षाची एक महिला, तोटावार गल्ली येथील ९० वर्षाची एक महिला व ४५ वर्षाचा एक पुरुष, कोत्तेकल्लू येथील १६,१३ वर्षाचे दोन पुरुष व ३२ वर्षाची एक महिला, शहापूर येथील ४३, ६० वर्षाच्या दोन महिला, देशपांडेनगर येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, गांधीनगर येथील ३७ वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील ३० वर्षाचा एक पुरुष, किनवट येथील ५५ वर्षाचा एक पुरुष, इस्लापूर येथील ६० वर्षाची एक महिला, मोमिनपुरा किनवट येथील ४५ वर्षाचे दोन पुरुष व ६० वर्षाची एक महिला, बारुळ कंधार येथील २४ वर्षाचा एक पुरुष व ४४ वर्षाची एक महिला, कासरवाडी येथील २७ वर्षाची एक महिला, हदगाव येथील १६, ४७ वर्षाचे दोन पुरुष, लोहा येथील २२ वर्षाचा एक पुरुष, मुखेड येथील ५० वर्षाच एक पुरुष, खरबसाडगाव येथील ३४, ३८ वर्षाच्या दोन महिला, कारला मुखेड येथील ३३ वर्षाचा एक पुरुष, दापका येथील ४०, ४२ वर्षाचे दोन पुरुष, वाल्मीकनगर मुखेड येथील ९०, १८ वर्षाच्या दोन महिला, कोळीगल्ली येथील ३० वर्षाचा एक पुरुष, गायकवाड येथील ४१ वर्षाचा एक पुरुष, जुहूर येथील २४, २६ वर्षाच्या दोन महिला व ७३ वर्षाचा एक पुरुष, नायगाव येथील २७ वर्षाची एक महिला, वसंतनगर येथील १७ वर्षाचा एक पुरुष व ८ वर्षाची एक मुलगी, घुंगराळा येथील २५ वर्षाचा एक पुरुष व ४५, ६० वर्षाच्या दोन महिला, भायेगाव उमरी येथील २६ वर्षाचा एक पुरुष, पुसा येथील ५६ वर्षाची एक महिला, खरबी ता. उमरखेड येथील २८ वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.


 


अँटिजेन तपासणीद्वारे समीराबाग नांदेड येथील ३६ वर्षाचा एक पुरुष, वसरणी येथील २० वर्षाची एक महिला, उदयनगर येथील ४९, ९० वर्षाचे दोन पुरुष, भालचंद्रनगर येथील ४० वर्षाची एक महिला, देगलूरनाका येथील ४५ वर्षाचा एक पुरुष, खडकपुरा येथील २७ वर्षाचा एक पुरुष, रहेमतनगर येथील २९ वर्षाचा एक पुरुष, वेदांतनगर येथील ५० वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर येथील २५ वर्षाचा एक पुरुष, हिंगोली नाका येथील २४ वर्षाचा एक पुरुष, कामठा येथील ५० वर्षाचा एक पुरुष, कासराळी बिलोली येथील १३, १५, ४१ वर्षाचे तीन पुरुष, इंदरानगर येथील २६ वर्षाचा एक पुरुष व १६ वर्षाची एक महिला, गंगास्थान निजामाबाद येथील ३६, ३९, ४१, ४१ वर्षाचे चार पुरुष, बाळापूर धर्माबाद येथील ३० वर्षाचा एक पुरुष, कुंठागल्ली येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील २३ वर्षाचा एक पुरुष, रुक्कीनीनगर येथील २५ वर्षाचा एक पुरुष, बेलूर येथील २४, २६ वर्षाचे दोन पुरुष, रत्नाळी येथील १८ वर्षाचा एक पुरुष, समराळा येथील ३५ वर्षाचा एक पुरुष, रसीकनगर येथील ४३ वर्षाचा एक पुरुष, सरस्वतीनगर ४५ वर्षाचा एक पुरुष, बालाजीनगर येथील ५२ वर्षाचा एक पुरुष, देवीगल्ली २१ वर्षाचा एक पुरुष, गांधीनगर येथील ३८ वर्षाचा एक पुरुष, निजामाबाद येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, इंदिरानगर धर्माबाद येथील ३२ वर्षाचा एक पुरुष हे अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.


 


जिल्ह्यात ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १४५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २९२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ३३, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २३, बिलोली कोविड केअर सेंटर येथे २०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९९, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ४६, लोहा कोविड केअर सेंटर येथे १, हदगाव कोविड केअर सेंटर २५, भोकर कोविड केअर सेंटर ३, कंधार कोविड केअर सेंटर येथे ११, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३३, किनवट कोविड केअर सेंटर येथे १०, खाजगी रुग्णालयात १०९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ४ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित, हैदराबाद येथे २ तर मुंबई येथे २ बाधित संदर्भित झाले आहेत.


 



  • जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

  • सर्वेक्षण – १ लाख ४९ हजार ३०५,

  • घेतलेले स्वॅब – १४ हजार ३०,

  • निगेटिव्ह स्वॅब- ११ हजार ३४७,

  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – १५४,

  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – १ हजार ८३९,

  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – २,

  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – २८,

  • मृत्यू संख्या – ८१,

  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ८८७,

  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ८५९,

  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ३४२.

  • प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.

  •  


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


टिप्पण्या